मुंबई

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीला ओव्हरलोड वाहने जबाबदार

CD

अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा

पनवेल, ता. ७ (बातमीदार) : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाट परिसरात सध्या अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत आहे. अतिरिक्त माल भरून घाट चढणाऱ्या ट्रेलर आणि मालवाहतूक वाहनांचा वेग मंदावल्याने द्रुतगती मार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागत आहेत. प्रशासनाकडून अशा वाहनांवर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप छोट्या वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
कळंबोली येथील लोखंड-पोलाद बाजार, तळोजा औद्योगिक वसाहत, जेएनपीए बंदर, मुंबई बंदर तसेच वाडा, भिवंडी आणि रसायनी-पातळगंगा परिसरातून दररोज मोठ्या प्रमाणात मालवाहतूक पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच इतर राज्यांकडे केली जाते. विशेषतः कळंबोली आणि तळोजा परिसरातून निघणारी वाहने बोरघाट चढताना वेग कमी करतात आणि त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. कळंबोली परिसरातील स्टील बाजार येथे मोठ्या प्रमाणात लोखंड व पोलादाचा व्यापार होत असून दररोज अनेक ट्रेलर माल घेऊन विविध भागांकडे रवाना होतात. तसेच जेएनपीए बंदरातूनही कंटेनर वाहतूक मोठ्या प्रमाणात या मार्गाने केली जाते; मात्र अधिक भाडे मिळविण्याच्या उद्देशाने काही वाहतूकदार क्षमतेपेक्षा जास्त माल भरून वाहने घाटाच्या दिशेने पाठवत असल्याची माहिती समोर येत आहे.
या मार्गावर टोलनाके, वाहतूक पोलिस तसेच परिवहन विभागाची भरारी पथके तैनात असतात, तरीही ओव्हरलोड वाहनांवर प्रभावी कारवाई होत नसल्याची तक्रार होत आहे. काही ठिकाणी फक्त दंड वसुलीवर भर दिला जात असून अतिरिक्त मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे.
दरम्यान, धर्मवीर वाहतूक सेनेने या प्रश्नावर आवाज उठवला आहे. संघटनेचे अध्यक्ष रामदास शेवाळे यांनी पनवेल येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांना निवेदन देत ओव्हरलोड वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ओव्हरलोड वाहनांवर कडक कारवाई केल्यास वाहतूक कोंडी कमी होऊन अपघातांचे प्रमाणही घटेल, असे मत संघटनेने व्यक्त केले आहे.
............
बोरघाटात क्लच प्लेट जळल्याने दुर्गंधी
बोरघाट चढताना अनेकदा अवजड वाहनांच्या क्लच प्लेट जळल्याचा तीव्र वास परिसरात जाणवतो. तज्ज्ञांच्या मते, वाहनावर क्षमतेपेक्षा जास्त माल भरल्यास घाट चढताना इंजिन आणि क्लचवर अधिक ताण येतो. त्यामुळे क्लच प्लेट गरम होऊन जळण्याची शक्यता वाढते. या मार्गावर वाहतूक पोलिस आणि परिवहन विभागाची पथके नियमित गस्त घालत असतानाही ओव्हरलोड वाहनांवर प्रभावी कारवाई होत नसल्याने या प्रकाराकडे दुर्लक्ष का केले जाते, असा प्रश्न वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यातील उड्डाणपूल कार्यक्रमात प्रशासनाची घोडचूक! चूक दुरुस्त करण्यासाठी उभारलेल्या पुलाचे नावच चुकवलं; प्रकरण काय?

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Pune Crime: खेळ मांडला! एका महिन्यात विवाहितेचे लावले तीन लग्न; पुण्यातल्या रॅकेटचा पर्दाफाश

Latest Marathi News Update: आज कुठे काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Treatment deadline: रुग्णालयात ३० मिनिटांत उपचार सुरू करणे बंधनकारक; नवीन आपत्कालीन नियमावली लागू, प्रशासनाचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT