ग्रामीण महिला नेतृत्व
परिषदेचे आयोजन
भाईंदर, ता. ७ (बातमीदार) ः उत्तन येथे भारत नारीशक्ती संगम या ग्रामीण महिला नेतृत्व परिषदेचे आयोजन ८ आणि ९ मार्चला करण्यात आले आहे. या दोनदिवसीय परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून, ही परिषद उत्तन येथील प्रबोधिनीच्या प्रांगणात पार पडणार आहे.
उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम) यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठीच्या या परिषदेत देशभरातील व्यवसाय, उद्योग, राजकारण आणि सामाजिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सुमारे ५०० ग्रामीण महिला सहभागी होणार आहेत. त्यांच्या यशस्वी वाटचालीचे अनुभवदेखील ते त्या परिषदेत मांडणार आहेत. त्यात प्रामुख्याने काजू व्यवसायात सुमारे दीड कोटींची उलाढाल करणाऱ्या प्रणाली गावडे, अत्यंत कष्टाने कापड व्यवसाय भरभराटीस नेलेल्या ज्योती तागडे, बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करणाऱ्या रेखा चव्हाण, आदर्श प्रभाग व्यवस्थापन आणि कोकम बटर उद्योजिका म्हणून तब्बल एक कोटींचा टप्पा पार करणाऱ्या जागृती पोटले यांचा समावेश आहे.
या महिलांनी त्यांच्यासोबत अनेकांना रोजगार तर दिलाच आहे; पण समाजात आपल्या प्रेरणेने आणखी नेतृत्व निर्माण कसे होईल, याकडेही विशेष लक्ष दिले आहे. अशा महिला याप्रसंगी संवाद साधणार असून अशा पद्धतीचा हा पहिलाच कार्यक्रम होत असल्याची माहिती रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.