मुंबई

एसआयआयएलसी

CD

एसआयआयएलसी
‘लीव्ह अँड लायसन्स’ मास्टरक्लास
पुणे, ता. ७ : मालमत्ता भाड्याने देताना आजकाल बहुतांश नागरिक ‘रेंट’ किंवा ‘लीज’ कराराऐवजी ‘लीव्ह अँड लायसन्स’ पद्धत पसंत करत आहेत. या प्रक्रियेतून मालकाचे हक्क सुरक्षित राहतात आणि भाडेकरूला तात्पुरते निवास किंवा व्यावसायिक वापराचे अधिकार मिळतात; मात्र योग्य करारनामा तयार करणे, कागदपत्रांची पूर्तता, स्टॅम्प ड्युटी व नोंदणी शुल्काची गणना, शासकीय पोर्टलवर फी भरणे, बायोमेट्रिक प्रक्रिया, तसेच पोलिसांना कळविणे, हे सर्व टप्पे तांत्रिक ज्ञानाशिवाय अवघड ठरू शकतात. याबाबत मार्गदर्शन करणारा मास्टरक्लास ९ मार्चला आयोजिला आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५, ८९५६३४४४७५, ७३५०००१६०२, ७३५०००१६०३

ई-कॉमर्समधील ड्रॉप शिपिंग बिझनेस मॉडेल
ई-कॉमर्समध्ये यशस्वी करिअर घडवायचं स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी खास आयोजिलेली ड्रॉपशिपिंग बिझनेस मॉडेल ही ऑनलाइन कार्यशाळा १६ मार्चपासून आयोजिली आहे. ड्रॉप शिपिंग ही अशी पद्धत आहे जिथे कोणतीही इन्व्हेंटरी किंवा गोदामाची गरज न पडता तुम्ही ऑनलाइन स्टोअर चालवू शकता. फक्त योग्य उत्पादने, विश्वासार्ह पुरवठादार आणि परिणामकारक मार्केटिंगच्या साहाय्याने तुम्ही स्वतःचा व्यवसाय काही तासांत सुरू करू शकता. कार्यशाळेत तुम्हाला शून्य इन्व्हेंटरीतून स्वतःचा स्टोअर तयार करून प्रत्यक्ष व्यवसाय कसा सुरू करावा, हे शिकवले जाईल. यामध्ये ड्रॉप शिपिंगची माहिती, शॉपिफाय वेबसाईट डेव्हलपमेंटचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि सोशल मीडियावर मार्केटिंग जाहिराती कशा तयार करायच्या, याचे मार्गदर्शन होणार आहे.

वास्तुशास्त्र कार्यशाळा
वास्तुशास्त्रानुसार घर, ऑफिस वा दुकान कसे असावे इ.बाबत माहिती करून देणारी ऑनलाइन कार्यशाळा १६ मार्चपासून आयोजिली आहे. वास्तू दोषमुक्त असावी, ही इच्छा बाळगणाऱ्या सर्वांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे. कार्यशाळेत वास्तुशास्त्र काय आहे, वास्तुदोष कोणते, त्याचे परिणाम कोणाला जाणवतात, दिशा-उपदिशा, अधिपती देवता आणि पंचतत्त्व, दिशा आणि प्रभाव, वास्तुपुरुष मंडल, मर्मस्थान, उपमर्मस्थान, जमीन कशी निवडावी, घर नक्की कोठे व कसे बांधले पाहिजे, घर बांधण्यास प्रारंभ कसा करावा, अंतर्गत रचना कशी असावी, मुख्य दरवाजाची दिशा ओळखणे, दरवाजा कोठे करावा, वास्तूचे आयुष्य आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे.

आयुर्वेदिक सौंदर्य उत्पादने प्रशिक्षण
आयुर्वेदिक पद्धतीने विविध सौंदर्य उत्पादने तयार करण्याचे मार्गदर्शन करणारे विशेष प्रशिक्षण २२ मार्चला आयोजिले आहे. यात नैसर्गिक घटकांचा वापर करून सुरक्षित आणि त्वचेसाठी उपयुक्त सौंदर्य उत्पादने कशी तयार करावीत, याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले जाणार आहे. फेस क्रीम, शॅम्पू, फेसवॉश, साबण, लिप बाम, परफ्यूम, फेस पॅक, काजळ आदी विविध उत्पादने तयार करण्याच्या पद्धती शिकवण्यात येणार आहेत. यासोबतच नैसर्गिक घटकांची निवड, उत्पादन तयार करताना घ्यावयाची काळजी, साठवणूक पद्धती तसेच बाजारपेठेतील मागणी याविषयीही माहिती दिली जाणार आहे. हे प्रशिक्षण बचत गटातील महिला, ब्युटी प्रोफेशनल्स, गृहिणी तसेच स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठी विशेष उपयुक्त ठरणार आहे. नैसर्गिक सौंदर्य उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेता या प्रशिक्षणातून सहभागी महिलांना स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Motor vehicle tax: जुनी वाहने स्क्रॅप केल्यास मोठी करसवलत मिळणार! महायुती सरकारची मोठी घोषणा; प्रदूषण करणारी वाहने बंद करणार

जॉनी लिव्हरच्या लेकाला 12व्या झालेला ट्युमर ! पहिली सर्जरी फेल, दुसरी अमेरिकेत; "त्यावेळी फादरच्या रूपात.."

नागपूरला स्फोटाची राजधानी करायची आहे का? एसबीएल कंपनी स्फोटप्रकरणी अद्याप कारवाई नाही, अनिल देशमुख संतापले...

Latest Marathi News Live Update : १४ हजारासाठी विधवा महिलेचा खून, आरोपीस अकोटमधून अटक

रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी एक महिन्याची सूट? अमेरिकेच्या दाव्यावर भारत सरकारची स्पष्टता, काय म्हटलं?

SCROLL FOR NEXT