गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प खर्चात वाढ
१,३८२ कोटींवरून खर्च २,११३ कोटींवर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : गोरेगाव-मुलुंड लिंक रोड हा मुंबई महापालिकेचा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा प्रकल्प चार टप्प्यांत उभारण्यात येणार असून, चौथ्या टप्प्यातील कामाच्या खर्चात ८०० कोटींनी वाढ झाल्याचा मुद्दा शुक्रवारी (ता. ७) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चेला आला. या चौथ्या टप्प्यातील कामासाठी १,३८२ कोटींचे कंत्राट देण्यात आले होते. दरम्यान, हा खर्च तब्बल २,११३ कोटींवर गेल्याने स्थायी समितीच्या सर्वपक्षीय सदस्यांनी याबाबत प्रशासनाला जाब विचारला.
गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता हा एकूण १२.२० किमी लांबीचा प्रकल्प चार टप्प्यांत विभागलेला आहे. मुलुंड येथील पूर्व द्रुतगती महामार्ग ते ऐरोली टोलनाक्यापर्यंत या प्रकल्पाचा विस्तार करण्यात येणार आहे. शेवटच्या टप्प्यातील कामाचा प्रस्ताव पहिल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला होता. त्या वेळी सदस्यांनी या प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाल्याबद्दल आक्षेप घेतला. काँग्रेसचे गटनेते अश्रफ आजमी यांनी या प्रकल्पाच्या कंत्राटात संगनमत झाल्याचा आरोप केला. शिवसेनेचे यशोधर फणसे यांनीही या मुद्द्याला पाठिंबा दिला आणि या प्रकल्पाचे सादरीकरण करावे तसेच प्रकल्पाचा पाहणी दौरा आयोजित करावा, अशी मागणी केली. यावर या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात येईल आणि या प्रकल्पाचा पाहणी दौराही आयोजित करण्यात येईल, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.