मुंबई

जप्त केलेला माल परत करा !

CD

जप्त केलेला माल परत करा !
हुक्का, तंबाखू उत्पादक कंपन्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : हुक्का तंबाखू उत्पादक करणाऱ्या दोन कंपन्यांना त्यांचा जप्त केलेला माल पुन्हा कंपन्यांच्या ताब्यात द्या, असे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच राज्य अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) दिले आहे, हे आदेश देताना या मालाच्या राज्याबाहेरील निर्यातीलाही न्यायालयाने परवानगी दिली; मात्र त्याची राज्यात किंवा राज्याबाहेर विक्री न करण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. 

संबंधित कंपन्यांच्या कारखान्यांना ठोकलेले सील एफडीएने तातडीने हटवावे, असे आदेश देताना कारखान्यात निर्यातीसाठीचे उत्पादन सुरू ठेवण्याची परवानगी न्या. रवींद्र घुगे आणि न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठाने दिली. माल जप्तीची कारवाई चघळणाऱ्या तंबाखूवर लक्ष केंद्रित करणाऱ्या परिपत्रकाच्या आधारावर केली होती, फ्लेवर्ड सिगारेट किंवा सुगंधी तंबाखूवर नाही, असेही खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले.  एफडीएच्या मालजप्तीच्या कारवाईला सोएक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि हाय स्ट्रीट इम्पेक्स एलएलपी या दोन कंपन्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ठाणे आणि पुणे जिल्ह्यांतील कंपन्यांच्या आस्थापनांवर एफडीएने छापे टाकून हुक्का तंबाखू जप्त केला. जानेवारीच्या सुरुवातीला एफडीएने पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील सोएक्स इंडियाच्या उत्पादन युनिटवर कारवाई करून सुमारे ३१.६७ कोटी रुपयांचा कच्च्या आणि सुगंधी तंबाखूसह हुक्का फ्लेवर्स जप्त केले होते. तर ३० डिसेंबरला केलेल्या स्वतंत्र कारवाईत, एफडीएने भिवंडी, दापोडे येथील हाय स्ट्रीट इम्पेक्सच्या गोदामातून १९.४५ कोटी रुपयांची प्रतिबंधित हुक्का उत्पादने जप्त केली होती. त्यांची निकोटिन चाचणी सकारात्मक आली होती. तसेच १६ जुलै २०२५ला काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे कंपन्यांनी उल्लंघन केल्याचा दावा करून दोन्ही प्रकरणांमध्ये फौजदारी तक्रारी दाखल केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs NZ:'गौतम गंभीरने ठरवलं तर तो स्वतः बॅटिंगला येईल; कठीण निर्णय मी आणि कोच मिळून...', फायनलपूर्वी सूर्यकुमार स्पष्टच बोलला

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडच्या रोबोटिक्स आणि यूएव्ही सुविधेच्या भूमिपूजन समारंभाला उपस्थिती लावली

फक्त 8 दिवसांमध्ये पालटणार 3 राशींच्या रखडत्या नशिबाचा खेळ ! शुक्रादित्य राजयोगामुळे पडणार पैशांचा पाऊस

T20 World Cup : यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक बघितल्या गेलेला सामना कोणता? इंडिया-पाकिस्तान सामना राहिला तिसऱ्या क्रमांकावर...

'पूर्वेश अमर रहे'च्या घोषणांनी नागपूर हेलावले, वायुसेनेच्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT