दुचाकी अपघातात
एकाचा मृत्यू, एक जखमी
कर्जत, ता. ७ (बातमीदार) : कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर वासराला धडक लागून शनिवारी (ता. ७) झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालू लक्ष्मण ढोले (५८) यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. दुचाकीचालक हरिश्चंद्र मालू ढोले (२८) हा गंभीर जखमी झाला असून, त्यांना पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालय, कामोठे येथे हलविण्यात आले आहे.
मालू ढोले आणि त्यांचा मुलगा हरिश्चंद्र ढोले हे कशेळे येथून कर्जत उपजिल्हा रुग्णालयाकडे जात होते. कशेळेजवळील आंबिवली फाट्याच्या पुढे रस्त्याच्या मधोमध वासरू आल्याने त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या धडकेत दोघेही रस्त्यावर फेकले गेले. घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलिस ठाणेअंतर्गत कशेळे पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस हवालदार लालासाहेब तोरवे, पोलिस शिपाई राहुल जाधव आणि पोलिस शिपाई हंबीर यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रस्त्यावर भटक्या जनावरांमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.