मुंबई

“मम्मा” म्हटल्याच्या रागातून तीन वर्षाच्या दत्तक चिमुरडीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून सावत्र आईकडून अमानुष मारहाण,

CD

‘मम्मा’ म्हटल्याच्या रागातून
सावत्र आईकडून मारहाण

भिवंडी, ता. ७ (वार्ताहर) ः मातृत्वाला आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे शनिवारी (ता. ८) घडली. दत्तक घेतलेल्या तीन वर्षांच्या चिमुरडीने दुसऱ्या महिलेस ‘मम्मा’ म्हटल्याच्या रागातून सावत्र आईने चिमुरडीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तिला अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. दिलशान शेख असे अमानुष मारहाण करणाऱ्या सावत्र आईचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बापगाव येथील दिलशान शेख या महिलेने तीन वर्षांच्या चिमुरडीस दत्तक घेतले होते. ती चिमुरडी शेजारील महिलेस ‘मम्मा’ म्हटल्याचा राग दिलशान शेख हिला आल्याने तिने चिमुरडीस घरामध्ये कोंडून तिचे तोंड आणि डोळ्यात मिरची पावडर टाकून तिला मारहाण केली. या वेळी तिचा पती हे कृत्य करण्यापासून थांबवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा घृणास्पद प्रकार समोर आला. त्यानंतर पडघा पोलिस ठाण्यात या मारहाण करणारी सावत्र आई दिलशान शेख, पती शौकत समसुद्दीन शेख आणि मुलीला दत्तक देणारा उमेश येवाले या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चिमुरडीला बाल निरीक्षणगृहात दाखल केल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यातील उड्डाणपूल कार्यक्रमात प्रशासनाची घोडचूक! चूक दुरुस्त करण्यासाठी उभारलेल्या पुलाचे नावच चुकवलं; प्रकरण काय?

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Pune Crime: खेळ मांडला! एका महिन्यात विवाहितेचे लावले तीन लग्न; पुण्यातल्या रॅकेटचा पर्दाफाश

Latest Marathi News Live Update: मार्ग खुला झाल्यानंतर कतार भारताला एलएनजी पुरवठा सुरू करेल: सरकारी सूत्र

Treatment deadline: रुग्णालयात ३० मिनिटांत उपचार सुरू करणे बंधनकारक; नवीन आपत्कालीन नियमावली लागू, प्रशासनाचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT