मुंबई

आमादार दिलीप लांडेंविरोधातील निवडणुक याचिका फेटाळली

CD

आमदार दिलीप लांडेंविरोधातील याचिका फेटाळली

निवडणूक निकाल रद्द करण्यासाठी आवश्यक तथ्ये सादर करण्यास याचिकाकर्ते अपयशी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ७ : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्या विजयाला आव्हान देणारी निवडणूक याचिका उच्च न्यायालयाने शनिवारी (ता. ७) फेटाळून लावली. या याचिकेत निवडणूक निकाल रद्द करण्यासाठी आवश्यक असलेली महत्त्वाची तथ्ये उघड करण्यास याचिकाकर्ते अपयशी ठरल्याचे निरीक्षणही याचिका फेटाळताना न्यायालयाने नोंदवले.

विधानसभा २०२४च्या निवडणुकीत चांदिवली विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (शिंदे गट) आमदार दिलीप लांडे यांच्या विजयाला पराभूत उमेदवार मोहम्मद आरिफ लालन खान यांनी निवडणूक याचिकेतून आव्हान दिले होते. लांडे यांनी खान यांचा २०,६२५ मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता. लांडे यांना १,२४,६४१ मते तर खान यांना १,०४,०१६ मते मिळाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदानाच्या ४८ तासांच्या शांततेच्या काळात मतदारसंघात बेकायदा रोड शो केला होता. लांडेंच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिशाभूल करणारी माहिती होती आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) छेडछाड केल्याचा दावाही खान यांनी याचिकेत केला होता.

तथापि, संबंधित आरोप लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ अंतर्गत निवडणूक अवैध ठरवण्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर मर्यादेची पूर्तता करत नाहीत, असे निरीक्षण न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या एकलपीठाने आपल्या आदेशात नोंदवले. शिंदेंच्या रोड शो प्रतिबंधित कालावधीत झाल्याचे याचिकेत म्हटले आहे. शिंदे यांनी प्रचाराच्या प्रतिबंधित वेळेत भेट दिली असली तरीही कोणत्याही धमकी, जबरदस्ती, प्रलोभन किंवा मतदारांमध्ये चुकीची माहिती दिल्याचे तक्रार नाही, तसेच उमेदवारांनी स्वेच्छेने आवश्यकतेपेक्षा जास्त माहिती उघड करण्यास मनाई नाही आणि अशा माहितीचा मतदारांवर कसा परिणाम झाला, हे याचिकेत दाखवण्यात आलेले नाही. तर ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याच्या केवळ भीतीच्या आधारे मशीनची पडताळणी करणे, ही निवडणूक रद्द करण्याचा वैध आधार नाही, असेही न्यायालयाने ६० पानी आदेशात नमूद केले.

आणखी एक दिलासा
ऑक्टोबर २०२४ मध्ये पालिका आणि लांडे यांच्यातील १२.५ कोटी रुपयांच्या कुकर घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एका वकिलाने केलेली जनहित याचिका मागे घेतली. त्यात मूलभूत माहिती नसल्याचे लक्षात आल्यानंतर ही जनहित याचिका मागे घेण्यात आली. याचिकेत पालिकेच्या अधिकाऱ्यांसह आमदार लांडेंवर सार्वजनिक मालमत्तेचा गैरवापर करून गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप होता. महापालिकेने ५०,००० कुकर १२.५० कोटी रुपयांना बाजारभावापेक्षा चार पट जास्त किमतीने खरेदी केले होते. ही मोहीम एल वॉर्डमधील वंचितांसाठी असलेल्या महापालिकेच्या सामाजिक कल्याण योजनेचा एक भाग होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: इराणचा मोठा निर्णय! होर्मुज समुद्रधुनी केली खुली, जगभरातलं इंधन संकट टळलं; आता हल्ले करणार नसल्याचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update: क्रिकेट चाहत्यांच्या सोयीसाठी मुंबई आणि अहमदाबाद तसेच पुणे ते अहमदाबाद दरम्यान विशेष गाड्या

Treatment deadline: रुग्णालयात ३० मिनिटांत उपचार सुरू करणे बंधनकारक; नवीन आपत्कालीन नियमावली लागू, प्रशासनाचा कडक इशारा

T20 WC, IND vs NZ: 'अरे तेच तेच काय बोलता, काहीतरी वेगळं...' न्यूझीलंड कर्णधाराच्या वॉर्निंगवर सूर्यकुमारचं थेट उत्तर

स्ट्रेस फ्री झोन, शांत आणि योग क्षेत्र, अर्बन फॉरेस्ट अन् बरंच काही! मुंबईत अनोखे उद्यान उभारणार; पण कुठे? वाचा संपूर्ण योजना...

SCROLL FOR NEXT