मुंबई

रोजगार निर्मितीची जननी

CD

रोजगारनिर्मितीची जननी
सुनीता लोंढे यांच्या उपक्रमांचा आदिवासींना आधार

जव्हार, ता. ८ (बातमीदार) ः तालुक्यात तीन दशकांपासून सामाजिक कार्य करताना आदिवासी महिलांच्या कौशल्यातून रोजगारनिर्मिती करणाऱ्या सुनीता लोंढे यांची कार्यगाथा प्रेरणादायी ठरली आहे. १९९७-९८ पासून त्यांनी नवापूर, जांभिवली, कोंढवड, गुरुडबारी यांसारख्या दुर्गम गावांमध्ये महिलांना नाचणी व वरईपासून विविध खाद्यपदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण देत स्वावलंबनाचा मार्ग दाखवला आहे.
सुनीता लोंढे यांच्या प्रशिक्षणामुळे महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी मिळाली. तसेच पापड, चकली, कुरडई, चिवडा, नाचणी लाडू, खाकरा यांसारख्या पदार्थांची निर्मिती करून बाजारपेठेत विक्री करण्याचा मार्ग खुला झाला. या उपक्रमांमुळे अनेक महिलांचे आर्थिक सक्षमीकरण झाले. तसेच हस्तकला, अन्न व फळप्रक्रिया, बचत गट व्यवस्थापन, लघुउद्योगावर प्रशिक्षण देऊन महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात आला. आदिवासी भागातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विविध संस्थांच्या सहकार्याने प्रदर्शन व विक्रीची संधी दिली आहे.
---------------------
कामाची पोचपावती
समाजसेवा, महिला सक्षमीकरण, आदिवासी भागातील विकासासाठी त्यांचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे. सुनीता लोंढे यांच्या प्रयत्नांमुळे आदिवासी भागातील अनेक महिलांना स्वावलंबनाचा मार्ग मिळत असून लोंढे यांच्या कार्याला प्रजासत्ताकदिनी प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताच्या विजयात आमचाही वाटा...बाहेर बसून, खेळाडूंना पाणी पाजलं, नेट्समध्ये गोलंदाजी केली; मोहम्मद सिराजचा मजेशीर Video Viral

Kolhapur Sarpanch Missing : जंगलात सापडले जळालेले अवशेष, त्यांच्या मागे तोंडाला मास्क घालून बसलेली 'ती' व्यक्ती कोण? पाटगावचे माजी सरपंच आहेत तरी कुठं? घातपाताचा संशय

T20 World Cup विजेती टीम इंडिया पुन्हा निळ्या जर्सीत केव्हा दिसणार? जाणून घ्या २०२६ मधील वेळापत्रक; संजू पुन्हा इंग्लंड, किवींना झोडणार

Beed Crime Attack : बीडमध्ये लोखंडी रॉडने तरुणाला अमानुष मारहाण; हाताच्या हाडाचे झाले तीन तुकडे, पाठ-छातीवर धारदार शस्त्राने वार

Life Astrology : 'या' खास राशींच्या लोकांची जीवनरेखा असते 80 वर्षांपेक्षा जास्त, वृद्धत्वावर करतात मात

SCROLL FOR NEXT