मुंबई

मसोली-वडकून प्रवासात मनस्ताप

CD

मसोली-वडकून प्रवासात मनस्ताप
सहा महिन्यांतच काँक्रीटच्या रस्त्याची दुरवस्था

कासा, ता. ८ (बातमीदार) ः डहाणू नगर परिषद हद्दीतील मसोली-वडकून रस्त्याचे सहा महिन्यांपूर्वी काँक्रीटीकरण करण्यात आले होते. नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी तडे गेल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मसोली नाका ते वडकून काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या कामासाठी एक कोटी ५८ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या कामामध्ये मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण, रस्त्याकडील भराव, बाजूच्या गटारांच्या दुरुस्तीचा समावेश करण्यात आला होता. अवघ्या सहा महिन्यांत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात तडे पडले आहेत. तसेच रस्त्याकडील मातीचा भराव, गटारांचे कामही प्रलंबित आहे. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होण्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
------------------------
पावसाळ्यात त्रास
वडकून परिसरातील औद्योगिक कंपन्यांमधील अवजड वाहनेही ये-जा करतात. या परिसरात मोठी लोकवस्ती, महाविद्यालये असल्याने वाहनांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत पावसाळ्यात नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
-----------------------
वडकून रस्त्याचे काँक्रीटीकरण निकृष्ट दर्जाचे आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात तडे गेले असून माती भराव, गटाराचे काम अपूर्ण आहे. या विषयाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून ठेकेदाराच्या कार्यप्रणालीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
- विपुल पटेल, पदाधिकारी, शिवसेना
-----------------------
मसोली येथील रस्त्याच्या कामाबाबत चौकशी करून संबंधित ठेकेदारांना सूचना देण्यात येतील. कामाचा दर्जा निकृष्ट असल्यास दुरुस्ती केली जाईल.
- अक्षय गुडधे, मुख्याधिकारी, डहाणू नगर परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime Attack : बीडमध्ये लोखंडी रॉडने तरुणाला अमानुष मारहाण; हाताच्या हाडाचे झाले तीन तुकडे, पाठ-छातीवर धारदार शस्त्राने वार

Mumbai: मुंबईत फेरीवाले दिसणं कायमचं बंद होणार, महापालिकेचा कारवाईसाठी आक्रमक पवित्रा

Life Astrology : 'या' खास राशींच्या लोकांची जीवनरेखा असते 80 वर्षांपेक्षा जास्त, वृद्धत्वावर करतात मात

अपघातात २ कोटींच्या BMWचा चुराडा, जखमी अवस्थेत अडकून पडले; उद्योगपतीचा मृत्यू, चालक गंभीर

Ishan Kishan Girlfriend: ऑरेंज टँक टॉप, साधी जीन्स; वर्ल्ड कप विजयानंतर ईशान किशनसोबत दिसलेली गर्लफ्रेंड अदिती हुंडिया आहे तरी कोण? Video Viral

SCROLL FOR NEXT