मुंबई

महाराजस्व समाधान शिबिराचे उद्घाटन

CD

पालघरमध्ये महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

पालघर, ता. ८ : नागरिकांच्या महसुली व शासकीय कामांचा एका ठिकाणी आणि शक्यतो एका दिवसात निपटारा करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’मुळे जनता आणि प्रशासनातील अंतर कमी होणार आहे. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक दाखले व शासकीय सेवा सुलभपणे मिळणार असल्याचे प्रतिपादन पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.
माहीम मंडळ येथे आयोजित करण्यात आलेल्या महसूल समाधान शिबिराच्या जिल्हास्तरीय उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, पोलिस अधीक्षक यतिश देशमुख, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यातील ४५ महसूल मंडळ क्षेत्रे तसेच आठ नगर परिषद, नगर पंचायत आणि महानगरपालिका क्षेत्रात १५ मेपर्यंत टप्प्याटप्प्याने या शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. शनिवारी (ता. ७) माहीमसह चिंचणी (डहाणू), कुडूस (वाडा), विक्रमगड, जव्हार, मांडवी (वसई), मोखाडा आणि झरी (तलासरी) येथेही शिबिरे आयोजित करण्यात आली होती.
माहीम मंडळ अधिकारी कार्यालयाच्या बाजार शेड व परिसरात नागरिकांच्या सोयीसाठी १५ स्टॉल उभारण्यात आले होते. महसूल विभाग, कृषी विभाग तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे, पुरवठा विभागातील अडचणी दूर करणे, विविध दाखल्यांचे वितरण करणे, ॲग्री स्टॅक, आधार कार्ड आदी सेवांची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली.
दरम्यान, राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात पालघरमधील सातपाटी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मच्छीमार बंदर उभारण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच प्रस्तावित चौथी मुंबई आणि विमानतळ यांसारख्या प्रकल्पांमुळे येथील नागरिकांचे भवितव्य उज्ज्वल होईल, असा विश्वासही पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात शिक्षण व आरोग्याचा दर्जा उंचावणे, रोजगार व व्यापाराच्या संधी वाढवणे यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगत उद्योगांना चालना देण्यासाठी ग्रामपातळीवरून सुलभ अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताच्या विजयात आमचाही वाटा...बाहेर बसून, खेळाडूंना पाणी पाजलं, नेट्समध्ये गोलंदाजी केली; मोहम्मद सिराजचा मजेशीर Video Viral

Kolhapur Sarpanch Missing : जंगलात सापडले जळालेले अवशेष, त्यांच्या मागे तोंडाला मास्क घालून बसलेली 'ती' व्यक्ती कोण? पाटगावचे माजी सरपंच आहेत तरी कुठं? घातपाताचा संशय

T20 World Cup विजेती टीम इंडिया पुन्हा निळ्या जर्सीत केव्हा दिसणार? जाणून घ्या २०२६ मधील वेळापत्रक; संजू पुन्हा इंग्लंड, किवींना झोडणार

Beed Crime Attack : बीडमध्ये लोखंडी रॉडने तरुणाला अमानुष मारहाण; हाताच्या हाडाचे झाले तीन तुकडे, पाठ-छातीवर धारदार शस्त्राने वार

Life Astrology : 'या' खास राशींच्या लोकांची जीवनरेखा असते 80 वर्षांपेक्षा जास्त, वृद्धत्वावर करतात मात

SCROLL FOR NEXT