महिला पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांची नाकाबंदी
कल्याण, ता. ८ (वार्ताहर) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कल्याणमध्ये केवळ महिला अधिकारी आणि अंमलदारांनी संपूर्ण परिसराचा ताबा घेत नाकाबंदी करत वाहतूक विभागासह संयुक्त कारवाई केली. महात्मा फुले चौक पोलिस स्टेशन अंतर्गत कल्याण रेल्वे स्टेशन व परिसरात पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशान्वये व सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याण घेटे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई केली. या दरम्यान वाहन तपासणी करून चलान दिले. तसेच, स्थानक परिसरात पायी पेट्रोलिंग केले. पादचारी पुलावर पेट्रोलिंग दरम्यान अतिक्रमण विभागाच्या मदतीने अतिक्रमण हटवण्यात आले. यावेळी विविध कलमान्वये एकूण १०३ कारवाया करण्यात आल्या. या कारवाई दरम्यान चार महिला अधिकारी व ३२ महिला पोलिस अंमलदार हजर होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.