मुंबई

महिलांनी आत्मनिर्भर होऊन समाजात नेतृत्वाची भूमिका पार पाडावी – महापौर अ‍ॅड. हर्षाली चौधरी-थविल

CD

महिलांनी आत्मनिर्भर होऊन नेतृत्वाची भूमिका पार पाडावी
महापौर अ‍ॅड. हर्षाली चौधरी-थविल यांचे प्रतिपादन
कल्याण, ता. ८ (वार्ताहर) : महिलांनी आत्मनिर्भर होऊन समाजात नेतृत्वाची भूमिका पार पाडावी, असे आवाहन महापौर अ‍ॅड. हर्षाली चौधरी-थविल यांनी केले.जागतिक महिला दिनानिमित्त पालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत आंबिवली येथील लाईटहाऊस कौशल्य विकास केंद्रात विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी हर्षाली चौधरी-थविल व आयुक्त अभिनव गोयल यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच शहरातील विविध राजकीय पक्षांचे गटनेते, स्थानिक लोकप्रतिनिधी, अतिरिक्त आयुक्त व इतर अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात आंबिवली लाईटहाऊस कौशल्य विकास केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या महिला विद्यार्थिनींनी आपले अनुभव आणि मनोगत व्यक्त केले. कौशल्य प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास वाढला असून रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. मान्यवरांनी आपल्या भाषणात महिलांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि आर्थिक स्वावलंबनाचे महत्त्व अधोरेखित केले. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविणे, त्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि महिला सक्षमीकरणाला चालना देणे हा मुख्य उद्देश असल्याचे अभिनव गोयल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताच्या विजयात आमचाही वाटा...बाहेर बसून, खेळाडूंना पाणी पाजलं, नेट्समध्ये गोलंदाजी केली; मोहम्मद सिराजचा मजेशीर Video Viral

Kolhapur Sarpanch Missing : जंगलात सापडले जळालेले अवशेष, त्यांच्या मागे तोंडाला मास्क घालून बसलेली 'ती' व्यक्ती कोण? पाटगावचे माजी सरपंच आहेत तरी कुठं? घातपाताचा संशय

T20 World Cup विजेती टीम इंडिया पुन्हा निळ्या जर्सीत केव्हा दिसणार? जाणून घ्या २०२६ मधील वेळापत्रक; संजू पुन्हा इंग्लंड, किवींना झोडणार

Beed Crime Attack : बीडमध्ये लोखंडी रॉडने तरुणाला अमानुष मारहाण; हाताच्या हाडाचे झाले तीन तुकडे, पाठ-छातीवर धारदार शस्त्राने वार

Life Astrology : 'या' खास राशींच्या लोकांची जीवनरेखा असते 80 वर्षांपेक्षा जास्त, वृद्धत्वावर करतात मात

SCROLL FOR NEXT