मुंबई

नागांव येथे अभिवाचन कट्टा उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

राजिपतर्फे शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यशाळा
अलिबाग, ता. ८ ( वार्ताहर) : रायगड जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत प्रथम फाउंडेशनच्या सहकार्याने नुकतीच अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये केंद्रप्रमुख, शिक्षक, गटशिक्षण अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांची कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहितुले, उपशिक्षणाधिकारी सुनील भोपळे, संतोष शेडगे, विस्तार अधिकारी कल्पना काकडे, निपुण महाराष्ट्र जिल्हा समन्वयक क्षमा खेडेकर, जिल्हा समन्वयक निनाद नागले तसेच प्रथम फाउंडेशनचे राज्य कार्यक्रम प्रमुख शंकर पौळ उपस्थित होते. जिल्ह्यातील सुमारे १७० शिक्षक आणि केंद्रप्रमुखांनी सहभाग घेतला.
या वेळी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या भाषा व गणित विषयाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना गुणवत्ता व आकलन क्षमता वाढविण्यासाठी आधुनिक अध्यापन पद्धतींचे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात गुणवत्तेसाठी चांगले काम करणाऱ्या ११ शाळा तसेच ‘पोस्ट ऑफ मंथ’ ठरलेल्या सात शिक्षक आणि तीन केंद्रप्रमुखांचा मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
----------------------------------------
नागांव येथे अभिवाचन कट्टा उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
अलिबाग, ता. ८ (वार्ताहर) : नागांव येथील विसावा सभागृहात पीएनपी कला विकास मंडळांतर्गत ग्रामीण रंगभूमीतर्फे आयोजित ‘अभिवाचन कट्टा’ कार्यक्रम रविवारी (ता. २२) उत्साहात पार पडला. ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम गेल्या वर्षापासून सातत्याने राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमात किशोर म्हात्रे लिखित ‘संगीत अंत्ययात्रा’ या एकांकिकेचे प्रभावी अभिवाचन सादर करण्यात आले. अभिवाचनातून नाट्यकृतीतील आशय, भावभावना आणि सामाजिक संदर्भ प्रभावीपणे मांडण्यात आले. उपस्थित रसिकांनी कलाकारांच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत भरभरून दाद दिली.
कार्यक्रमात संचित पानसरे, वर्षा सुतार, अश्रिता बारसे, आरती पाठक आणि प्रतीक पानकर यांनी सहभाग घेतला. या एकांकिकेचे दिग्दर्शन अमरदीप ठोंबरे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन शिल्पा आठवले आणि हिमालय चोरघे यांनी केले. ग्रामीण रंगभूमीच्या कलाकारांनी एकत्र येत उत्कृष्ट सादरीकरण करून हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime Attack : बीडमध्ये लोखंडी रॉडने तरुणाला अमानुष मारहाण; हाताच्या हाडाचे झाले तीन तुकडे, पाठ-छातीवर धारदार शस्त्राने वार

Mumbai: मुंबईत फेरीवाले दिसणं कायमचं बंद होणार, महापालिकेचा कारवाईसाठी आक्रमक पवित्रा

Life Astrology : 'या' खास राशींच्या लोकांची जीवनरेखा असते 80 वर्षांपेक्षा जास्त, वृद्धत्वावर करतात मात

अपघातात २ कोटींच्या BMWचा चुराडा, जखमी अवस्थेत अडकून पडले; उद्योगपतीचा मृत्यू, चालक गंभीर

Ishan Kishan Girlfriend: ऑरेंज टँक टॉप, साधी जीन्स; वर्ल्ड कप विजयानंतर ईशान किशनसोबत दिसलेली गर्लफ्रेंड अदिती हुंडिया आहे तरी कोण? Video Viral

SCROLL FOR NEXT