महिला दिनानिमित्त समुपदेशन व्याख्यान
कल्याण, ता. ८ (वार्ताहर) ः जागतिक महिला दिननिमित्त शनिवारी (ता. ७) महापालिकेतर्फे अचिव्हर्स महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी समुपदेशन व्याख्यान पार पडले. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थिनींना, आत्मविश्वास आणि स्व-ओळख, किशोरावस्थेतील शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळीबद्दल योग्य माहिती व स्वच्छता, सुरक्षितता व स्वतःचे संरक्षण, चांगला-वाईट स्पर्श, ऑनलाइन सुरक्षितता, ‘नाही’ म्हणण्याचे धाडस, शिक्षणाचे महत्त्व व करिअर स्वप्ने, सोशल मीडिया वापराचे फायदे-तोटे आदी विविध विषयांवर मानसशास्त्रज्ञ प्रोजेक्ट डायरेक्टर आरती बनसोडे यांनी मार्गदर्शन केले.
यासमयी समाज विकास विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड, समाज विकास अधिकारी प्रशांत गवाणकर, वूमन्स वेलफेअर फाउंडेशनच्या संचालिका मिनाक्षी उज्जैनकर, अचिव्हर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. महेश भिवंडीकर,अचीव्हर्स कॉलेजच्या अध्यक्षा रेखा भिवंडीकर, समन्वयक सना खान, सिद्धी चव्हाण, वूमन्स वेलफेअर फाउंडेशन टीम विनिता माने, स्वाती डोलारे, कृतीका मोरे, रुतीका दामले, अमृता गायकवाड, ज्योत्स्ना हांडे, हर्षिला नरवडे, वैष्णवी लोखंडे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.