मुंबई

लग्नाचे आमिष दाखवून पिडीतेवर बलात्कार

CD

लग्नाच्या भूलथापा देऊन पीडितेवर अत्याचार
आरोपीला १४ वर्षांचा सश्रम कारावास
अलिबाग, ता. ८ (वार्ताहर) : लग्नाच्या भूलथापा देऊन पीडितेवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी नागेश पोपट गावडे (४३, रा. पोलिस मुख्यालय, अलिबाग; मूळ विद्यानगर, माळेगाव, ता. बारामती, जि. पुणे) याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. तिवारी यांनी १४ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या खटल्याचा निकाल मंगळवारी (ता. २४) देण्यात आला.
हा गुन्हा जुलै २०१३ ते डिसेंबर २०१४ या कालावधीत घडला. आरोपी व फिर्यादी हे दोघेही पोलिस शिपाई असून, अलिबाग पोलिस मुख्यालयात कार्यरत होते. प्रशिक्षणादरम्यान आरोपीने फिर्यादीशी जवळीक साधून आपले पहिले लग्न झाले असल्याचे लपवून तिला लग्नाच्या भूलथापा दिल्या. त्यानंतर तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले आणि त्याचे व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल केले. तसेच आर्थिक मदत मागून फसवणूकही केली. फिर्यादीने संबंध तोडण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपीने तिला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. अखेर पीडितेने अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता कोमल राठोड यांनी सरकार पक्षातर्फे १७ साक्षीदार तपासले. तपास अधिकारी बी. बी. चौधरी यांनी तपास पूर्ण केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीला १४ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताच्या विजयात आमचाही वाटा...बाहेर बसून, खेळाडूंना पाणी पाजलं, नेट्समध्ये गोलंदाजी केली; मोहम्मद सिराजचा मजेशीर Video Viral

Kolhapur Sarpanch Missing : जंगलात सापडले जळालेले अवशेष, त्यांच्या मागे तोंडाला मास्क घालून बसलेली 'ती' व्यक्ती कोण? पाटगावचे माजी सरपंच आहेत तरी कुठं? घातपाताचा संशय

T20 World Cup विजेती टीम इंडिया पुन्हा निळ्या जर्सीत केव्हा दिसणार? जाणून घ्या २०२६ मधील वेळापत्रक; संजू पुन्हा इंग्लंड, किवींना झोडणार

Beed Crime Attack : बीडमध्ये लोखंडी रॉडने तरुणाला अमानुष मारहाण; हाताच्या हाडाचे झाले तीन तुकडे, पाठ-छातीवर धारदार शस्त्राने वार

Life Astrology : 'या' खास राशींच्या लोकांची जीवनरेखा असते 80 वर्षांपेक्षा जास्त, वृद्धत्वावर करतात मात

SCROLL FOR NEXT