अंबरनाथ, ता. ८ (वार्ताहर) : अंबरनाथमध्ये एका बँक व्यवस्थापकाला सायबर ठगांनी आठ लाख ३६ हजार ९९६ रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, महेंद्र सारजन तिवारी (वय ४६) हे एका नामांकित बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत असून ते अंबरनाथ पश्चिमेतील बुवापाडा परिसरात राहतात. २ मार्चला सायंकाळच्या सुमारास ते कल्याण येथील कार्यालयात असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांना वारंवार फोन करून तुमची एफडी तुटेल, अशी भीती दाखवत बँकिंग संदर्भातील माहिती मागवली. विविध कारणे सांगत आरोपीने त्यांच्या खात्यातून इंडसइंड बँक, अंबरनाथ पूर्व येथील खात्यातून एकूण आठ लाख ३६ हजार ९९६ रुपये ऑनलाइन व्यवहाराद्वारे काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिवारी यांनी ५ मार्चला अंबरनाथ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रूपाली साळवे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.