मुंबई

महिला दिनानिमित्त ‘रणरागिणी’ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

‘रणरागिणी’ मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
साडेसातशे महिलांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
कल्याण, ता. ८ : जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘रणरागिणी मॅरेथॉन स्पर्धेला’ महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. षोडशवयीन मुलींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत सुमारे साडेसातशे महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेत ‘रणरागिणी’ हे नाव सार्थ ठरविले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण रनर्स ग्रुप आणि वैष्णवी मॅटर्निटी होम यांच्या संयुक्त विद्यमाने १०, ५ आणि ३ किमी अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. शहरातील विविध भागांतील महिलांनी उत्साहाने या स्पर्धेत धाव घेतली. स्पर्धेदरम्यान ‘बेस्ट थीम’ या विभागात काही महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत सहभागी होत स्त्री शिक्षण आणि समतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला. स्पर्धेतील विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
यावेळी हर्षाली चौधरी आणि अभिनव गोयल यांनी विजेत्या महिलांचे अभिनंदन करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. समाजात महिला या प्रेरणास्त्रोत असून कुटुंब आणि समाजाचा आधारस्तंभ आहेत, असे मत आयुक्त अभिनव गोयल यांनी व्यक्त केले. तसेच वैष्णवी मॅटर्निटी होमचे डॉ. अश्विन कक्कर, ट्रायमॅटिक्स संस्थेच्या डॉ. शोभा पाटील, स्पर्धेचे प्रायोजक आणि सहभागी महिलांचे त्यांनी अभिनंदन केले.
या कार्यक्रमावेळी महापालिकेच्या ऊर्जा संवर्धन जनजागृती कक्षालाही मान्यवरांनी भेट दिली. अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत) प्रशांत भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेल्या या कक्षाचे महापौर आणि आयुक्तांनी कौतुक करत ऊर्जा संवर्धनाबाबतची जनजागृती पुढेही सुरू ठेवण्याचे निर्देश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Parishad शिंदेंच्या बालेकिल्ल्यात फडणवीसांचे हुकमी एक्के, भाजपचा ताकद वाढवण्याचा प्रयत्न

Stock Market Today: शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 380 अंकांनी वाढला; आज Adani सह 'हे' शेअर्स राहणार फोकसमध्ये

Latest Marathi News Live Update : लोणार तालुक्यात मध्यरात्री भीषण आग

स्मिता पाटील यांच्या मृत्यूवेळी रुग्णालयात काय झालेलं? मैत्रिणीनं सांगितला किस्सा, म्हणाल्या, 'त्या' पत्रांमधून कळालं की...

दिंडोरी अपघात प्रकरणी चौकशी समितीने अहवाल प्रशासनाकडे सोपवला, ठेकेदार अन् अधिकाऱ्यांवर ठपका; रस्त्याचे काम अपूर्ण

SCROLL FOR NEXT