मुंबई

देहेन येथे तुकाराम बीज उत्साहात

CD

देहेन येथे तुकाराम बीज उत्साहात
पोयनाड, ता. ८ (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील आध्यात्मिक परंपरा जपणारे गाव म्हणून ओळख असलेल्या देहेन येथे गुरुवारी तुकाराम बीज उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त सकाळपासून काकडा आरती, संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे पारायण तसेच भजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
दुपारी १२ वाजता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन सोहळ्यावर हभप भिकाजी महाराज निगडे (आमटेम–पेण) यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. यावेळी पुष्पवृष्टी करून “जगद्गुरू संत तुकाराम महाराज की जय” आणि “ज्ञानोबा माऊली तुकाराम” अशा जयघोषात सोहळा संपन्न झाला.
मागील सात दिवसांपासून संत तुकाराम महाराज मंदिरात सुरू असलेल्या तुकाराम गाथा पारायणाची सांगता या दिवशी करण्यात आली. या कालावधीत विविध कीर्तनकारांनी आपल्या प्रभावी कीर्तनातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. दररोज होणाऱ्या हरिपाठालाही नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
तुकाराम बीजेनिमित्त आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. पोयनाड पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. हा सुवर्ण महोत्सवी तुकाराम बीज उत्सव यशस्वी करण्यासाठी श्री संत तुकाराम महाराज मंडळ, ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ तसेच तरुणवर्गाने परिश्रम घेतले. रात्री पालखी मिरवणूक काढून सोहळ्याची सांगता करण्यात आली.


छायाचित्र :
पोयनाड : देहेन येथे तुकाराम बीज उत्सवानिमित्त हभप भिकाजी महाराज निगडे (आमटेम-पेण) यांचे कीर्तन संपन्न झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT