मुंबई

सीवूड्समध्ये दुतर्फा पार्किंगची समस्या

CD

सीवूड्समध्ये दुतर्फा पार्किंगची समस्या
बेलापूर, ता.८ (बातमीदार) : शहरात दिवसागणिक लोकसंख्या वाढत असताना वाढत्या शहरीकरणामुळे सुविधांचा अभावही जाणवत आहे. त्यात सीवूड्स परिसरातील पार्किंगची समस्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
सीवूड्स सेक्टर ४२ परिसरात अनेक लहान-मोठ्या सोसायट्या, उद्याने, वाचनालये तसेच शाळा आहेत. या परिसरात ये-जा करण्यासाठी प्रामुख्याने लहान रस्ते आहेत. मात्र या रस्त्यांवर दुतर्फा वाहनांचे पार्किंग होत असल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा रस्त्यावरून वाहने नेणे कठीण होते.
मधल्या काळात वाहतूक पोलिसांनी येथे कारवाई करत सम-विषम पद्धतीने पार्किंग करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र काही दिवसांनंतर पुन्हा पूर्वीसारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दुतर्फा पार्किंगमुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bar Association Election : महाराष्ट्र व गोवा वकील परिषद निवडणुकीत पुण्याचा दबदबा; २३ पैकी तब्बल आठ उमेदवार विजयी

US Iran Conflict: अमेरिका-इराणचं पुन्हा पेटलं! यूएसच्या तळांवर इराणने डागले क्षेपणास्त्र; दोन्ही देशांमधला युद्धविराम धोक्यात

Karad Crime : वैवाहिक वादातून पत्नीने भावाच्या मदतीने अभियंता पतीला कट रचून संपविले

Kuno Viral animal : दशकांनंतर कूनोच्या जंगलात दिसला रहस्यमयी 'प्राणी! कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाली पहिली झलक, मुख्यमंत्र्यांनी शेअर केले photo

मोदी सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला; यशोमती ठाकूरांचा हल्लाबोल, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अमरावतीत मशाली पेटल्या

SCROLL FOR NEXT