भिवंडीत विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू
भिवंडी, ता. ८ (वार्ताहर) : शहरातील एका १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूमुळे भिवंडीत खळबळ उडाली आहे. या विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी हत्येचा आरोप करत न्यायाची मागणी केली. या वेळी संतप्त कुटुंबीयांसह आणि स्थानिक रहिवाशांनी शनिवारी (ता. ७) रात्री अजमेरनगर ते नारपोली पोलिस ठाण्यापर्यंत पायी मोर्चा काढत आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, नारपोली पोलिस ठाणे हद्दीतील इयत्ता दहावीत शिकणारी १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी १ मार्चला बाथरूमला जात असल्याचे सांगून घरातून निघाली, ती रात्री उशिरापर्यंत घरी परतलीच नाही. नातेवाइकांनी दिवसभर शोध घेतल्यानंतरही मुलीचा काही पत्ता लागला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, ४ मार्चला संध्याकाळी येथील कैलासनगर टेकडीजवळ पोलिसांना या मुलीचा मृतदेह आढळून आला. यामध्ये मुलीच्या शरीराची स्थिती अत्यंत दयनीय असल्याचे सांगत मुलीची निर्दयपणे हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तर नारपोली पोलिस या हत्येमागील चौफेर दिशेने तपास करीत असून शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच हत्येमागील सर्व धागेदोरे स्पष्ट होणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कडबाने यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.