मुंबई

उल्हासनगरमध्ये खड्ड्यात कोसळली कार

CD

उल्हासनगरमध्ये खड्ड्यात कोसळली कार

उल्हासनगर, ता. ८ (वार्ताहर) : कॅम्प क्रमांक एक येथील सेंच्युरी रेयान शाळेसमोर रविवारी (ता. ८) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास एक चारचाकी कार रस्त्याच्या कडेला खोदलेल्या खोल खड्ड्यात पडल्याची घटना घडली. या कारमध्ये एका महिलेसह पाच जण प्रवास करत होते. घटना लक्षात येताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कारमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. नागरिकांच्या तत्परतेमुळे कारमधील सर्व पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या घटनेत प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, रस्त्याच्या कडेला खोदलेले खड्डे योग्यप्रकारे सुरक्षित न ठेवल्याने अशा अपघातांची शक्यता वाढत असल्याने प्रशासनाने तातडीने खबरदारी घेण्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: 'त्या' औषधाचं गूढ वाढलं! अशोक खरात प्रकरणात SIT कडून दोन डॉक्टरांची चौकशी

Wardha News: ‘स्मार्ट’ वर्ध्याचा चेहराच विद्रुप; जागोजागी अवैध पोस्टरबाजी; लाखोंचा महसूल बुडाला

CM Meeting Decision Gokul Dudh: ‘गोकुळ’दूध संघावर प्रशासक, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत निर्णय, प्रशासक म्हणून यांची होणार नियुक्ती

Washim News: कारंजा तालुक्यात सूर्याचा प्रकोप; तापमान ४३ अंशांवर; काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात कणेरीवाडीत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT