मुंबई

मुंबई, ठाण्यासह कोकणात ​पारा ४१ पार

CD

मुंबई, ठाण्यासह कोकणात ​पारा ४१ पार
भातसानगर ४३ अंशांसह सर्वाधिक उष्ण
​सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : मार्चच्या सुरुवातीलाच मुंबई महानगर क्षेत्रांसह अंतर्गत कोकणात उष्णतेच्या लाटेने भीषण रूप धारण केले असून, रविवारी मुंबई उपनगरे, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईत तापमानाचा पारा ४१ अंशांच्या पुढे सरकला. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील भातसानगर येथे तब्बल ४३ अंश इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली. तर अंतर्गत कोकणात सरासरीपेक्षा ५ ते ७ अंशांनी वाढ झाली. त्यामुळे आजचा रविवार हॉट ठरला असून, मेपर्यंत ही होरपळ कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

​कोकणच्या हवामानात सध्या ‘मायक्रो-क्लायमेट’चा मोठा फरक जाणवत आहे. ६ मार्चपर्यंत किनारपट्टीवर असलेला उष्णतेचा जोर आता ओसरला असून, सागरी वाऱ्यांमुळे मुंबई शहर, डहाणू आणि रत्नागिरीत तापमान ३३ ते ३५ अंशांच्या दरम्यान स्थिरावले आहे. मात्र समुद्रकिनाऱ्यापासून दूर असलेल्या पट्ट्यात कोरड्या हवेमुळे उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली असल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिली.

​रविवारी नोंदवण्यात आलेले तापमान
शहर कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
​भातसानगर : ४३.०
​बिरवाडी : ४२.८
​कर्जत : ४२.७
​पलावा : ४२.६
​चिपळूण : ४२.४
​मूंब्रा, ठाणे : ४१.१ ते ४२.२
​कल्याण-डोंबिवली : ४१.८ ते ४१.९
​नवी मुंबई (ऐरोली, नेरूळ) : ४०.० ते ४०.८

रस्ते पडले ओस
सकाळी १० वाजल्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागल्याने दुपारी १२ ते ४ या वेळेत ठाणे आणि कल्याणमधील मुख्य बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. अंबरनाथ, बदलापूर आणि कर्जत पट्ट्यात उष्णतेची तीव्रता अधिक असल्याने जनजीवन विस्कळित झाले. वाढत्या उष्णतेमुळे थंड पेये आणि रसवंतीगृहांवर नागरिकांची गर्दी दिसून आली. दरम्यान सागरी वाऱ्याच्या प्रभावामुळे किनारपट्टीवर तापमान मर्यादित असले तरी अंतर्गत भागात जमिनीवरील कोरड्या वाऱ्यांमुळे हीटवेव्हची स्थिती आहे. पुढील काही दिवस हा परिणाम जाणवू शकतो, अशी माहिती हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिली.


बदलापूरमध्ये तापमानाचा पारा ४२ अंशांवर!
बदलापूर (बातमीदार) : कोकणच्या अंतर्गत भागात उष्णतेच्या लाटेने जोरदार मुसंडी मारली असून, तापमानात मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. यामध्ये रविवारी (ता. ८) अनेक ठिकाणी तापमान सामान्यापेक्षा ५ ते ७ अंशांनी अधिक नोंदले गेले असून, त्यामुळे नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे बदलापूर शहराचे कमाल तापमान तब्बल ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने शहर अक्षरशः तापले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताच्या विजयात आमचाही वाटा...बाहेर बसून, खेळाडूंना पाणी पाजलं, नेट्समध्ये गोलंदाजी केली; मोहम्मद सिराजचा मजेशीर Video Viral

Kolhapur Sarpanch Missing : जंगलात सापडले जळालेले अवशेष, त्यांच्या मागे तोंडाला मास्क घालून बसलेली 'ती' व्यक्ती कोण? पाटगावचे माजी सरपंच आहेत तरी कुठं? घातपाताचा संशय

T20 World Cup विजेती टीम इंडिया पुन्हा निळ्या जर्सीत केव्हा दिसणार? जाणून घ्या २०२६ मधील वेळापत्रक; संजू पुन्हा इंग्लंड, किवींना झोडणार

Beed Crime Attack : बीडमध्ये लोखंडी रॉडने तरुणाला अमानुष मारहाण; हाताच्या हाडाचे झाले तीन तुकडे, पाठ-छातीवर धारदार शस्त्राने वार

Life Astrology : 'या' खास राशींच्या लोकांची जीवनरेखा असते 80 वर्षांपेक्षा जास्त, वृद्धत्वावर करतात मात

SCROLL FOR NEXT