मुंबई

भिवंडी महापालिकेच्या पहिल्या महासभेचा मुहूर्त टळला

CD

पहिल्या महासभेचा मुहूर्त टळला!
भिवंडी महापालिकेत स्थायी समिती सभापतिपदावरून धुसफूस; ‘सेक्युलर फ्रंट’चे गणित बिघडण्याची शक्यता

भिवंडी, ता. ९ (वार्ताहर) : महापालिकेच्या निवडणुकीनंतर अत्यंत बहुप्रतीक्षित असलेल्या पहिल्या महासभेचा सोमवारचा (ता. ९) मुहूर्त अखेर टळला आहे. महासभेची अधिसूचना निघाल्यानंतर ऐनवेळी अपरिहार्य कारणास्तव ही सभा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याची माहिती नगरसचिव विभागाने दिली आहे; मात्र या निर्णयामागे स्थायी समिती सभापतिपदाचे न सुटलेले पेच आणि अंतर्गत राजकीय संघर्ष कारणीभूत असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.

महापालिका सार्वत्रिक निवडणुकीनंतर महापौर निवडीसाठी प्रशासनाने तब्बल एक महिन्याचा कालावधी घेतला होता. २० फेब्रुवारी रोजी महापौर निवड झाल्यानंतर, १५ दिवसांनी ९ मार्च रोजी पहिल्या महासभेची तारीख निश्चित करण्यात आली होती. या महासभेच्या विषयपत्रिकेवर स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड आणि प्रभाग समित्यांची पुनर्रचना हे दोन महत्त्वाचे विषय होते. मात्र, स्थायी समिती सभापतिपदासाठी सत्ताधारी आघाडीमध्ये एकमत होऊ न शकल्याने ही सभा रद्द करण्याची नामुष्की ओढवल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) मध्ये उमेदवारीवरून संघर्ष
सत्तेच्या समीकरणानुसार, स्थायी समितीचे सभापतिपद राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) यांच्या वाट्याला जाणार होते. या पदासाठी दोन प्रमुख दावेदारांमुळे पक्षात धुसफूस सुरू आहे. माजी उपमहापौर इम्रान खान यांच्या कन्या ईशा खान यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरुवातीपासून होती. इतकेच नव्हे, तर सभापती कार्यालयाचे नूतनीकरणही त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले आहे, तर पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक फराज बहाउद्दीन यांनीही या पदावर आपला हक्क सांगितल्याने पेच निर्माण झाला आहे. याअंतर्गत वादामुळे सभापतिपदाचे समीकरण जुळवण्यात सत्ताधाऱ्यांची मोठी दमछाक होत आहे.

बहुमतासाठी आकडेमोड
काँग्रेस (३०) आणि राष्ट्रवादी (१२) यांच्या ‘सेक्युलर फ्रंट’कडे मिळून ४२ सदस्य आहेत, ज्यांच्या वाट्याला सात स्थायी समिती सदस्य येतात. मात्र, बहुमतासाठी (नऊ सदस्य) त्यांना अजूनही दोन मतांची गरज आहे. हा अतिरिक्त पाठिंबा कोणता गट देणार, यावर सत्तेचे भविष्य अवलंबून आहे.

सत्तेचे भवितव्य धोक्यात?
महापौरपद भाजपच्या बंडखोर गटाला देऊन काँग्रेसने उपमहापौरपदावर समाधान मानले होते. मात्र, आता स्थायी समितीच्या निवडीवरून मित्रपक्षांमध्ये निर्माण झालेली दरी आणि भाजपच्या अंतर्गत हालचाली पाहता, मोठ्या गाजावाजा करून स्थापन झालेली ही ‘सेक्युलर फ्रंट’ची सत्ता औटघटकेची ठरणार का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

पक्षीय बलाबल
काँग्रेस : ५ सदस्य
भाजपा : ४ सदस्य
राष्ट्रवादी (श. प.) : २ सदस्य
शिवसेना : २ सदस्य
इतर (सपा, कोविआ, भिंविआ) : प्रत्येकी १ सदस्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: इराणने युद्धाचे नियमच बदलले! F-25, F-22 जेट्स अन् शक्तिशाली मिसाईल्सला तोंड देणारं तंत्रज्ञान पहिल्यांदाच जगासमोर

Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडर टंचाईचा परिणाम; इंडक्शन शेगड्यांची दुपटी किमतीने विक्री, कोळसा व डिझेल शेगड्यांनाही वाढती मागणी

Pune Fire : शनिवारवाड्याजवळ पालापाचोळ्याला आग; नारायण दरवाजाला आगीची झळ

Pune News : पथारी शुल्कात ७५ टक्के कपात करा; स्थायी समितीपुढे ठराव

Gas Cylinder Shortage : कात्रज-भारती विद्यापीठ परिसरात गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा

SCROLL FOR NEXT