दुचाकी चोरांची धरपकड
मनोर-पालघर रस्त्यावर नाकाबंदीदरम्यान कारवाई
मनोर, ता.९(बातमीदार)ः मनोर पालघर रस्त्यावरील बिरसा मुंडा चौकात जिल्हा वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून नाकाबंदी केली होती. यावेळी चौकशी दरम्यान चोरीची दुचाकी जप्त करताना बोरिवली पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस अंमलदार मोहन मुंडे यांनी सहकाऱ्यांसोबत रविवारी सकाळी मनोर शहरातील बिरसा मुंडा चौकात वाहतूक कार्यरत होते. वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासोबत कारवाईसाठी नाकाबंदी लावली होती. अशातच पालघरच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीवरील तिघांना अडवण्यात आले. पोलिसांनी कागदपत्रे तपासल्यानंतर दंड ठोठावण्याची कारवाई केली. पण दुचाकी चोरीची असल्याचा संशय आल्याने त्यांनी थेट दुचाकीच्या मालकासोबत संपर्क साधला असता दुचाकी चोरीची तक्रार बोरिवली पोलिस ठाण्यात दिल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे तिघांना बोरिवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.