मुंबई

चर्चगेट-डहाणू महिला स्पेशल लोकल सुरू करण्याची प्रवाशांची मागणी

CD

डहाणू-चर्चगेट महिला स्पेशल लोकल सुरू करावी
डहाणू-विरार प्रवासी महिला संघाची मागणी

पालघर, ता. ९ (बातमीदार) : पश्चिम रेल्वेने, सकाळ व संध्याकाळच्या गर्दीच्या वेळे डहाणू-चर्चगेट व चर्चगेट-डहाणू महिला स्पेशल लोकल सुरू करावी, अशी मागणी डहाणू-विरार प्रवासी महिला संघाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेचे प्रवक्ते केदार काळे यांनी पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना याबाबत एक निवेदनही दिले आहे.
याबाबत काळे म्हणाले की, सध्या गर्दीच्या वेळेस डहाणू, वाणगाव, बोईसर, उमरोळी, पालघर, केळवे रोड, सफाळे, वैतरणा या रेल्वे स्थानकवरून प्रवास करणाऱ्या दैनंदिन महिला रेल्वे प्रवाशांना गर्दीचा खूप त्रास होत आहे. संपूर्ण दिवस नोकरीनिमित्त, शिक्षणानिमित्त, कामानिमित्त या महिला घरापासून दूर राहतात. सकाळी कामावर जाताना घरातील स्वयंपाक करून निघावे लागते, तर रात्री घरी आल्यानंतर त्यांना रात्रीच्या जेवणाची तयारी करावी लागते. अशात त्यांचा प्रवास थोडा तरी सुखकारक व्हावा व त्यांना प्रवासात थोडा आराम मिळावा, म्हणून महिला दिनाचे औचित्य साधून पश्चिम रेल्वेने गर्दीच्या वेळेस सकाळ-संध्याकाळ डहाणू-चर्चगेट व चर्चगेट-डहाणू महिला स्पेशल लोकल सुरू करावी. तसेच या विषयात खासदार व आमदार यांनीही लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT