आदिवासी समाजाने योजनांचा लाभ घ्यावा : डॉ. अशोक वुईके
पेण, ता. ९ (बातमीदार) : आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी शासन विविध योजना राबवत असून, समाजाने या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक वुईके यांनी केले. आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने पेण येथील आंबेगावमधील हॉटेल सौभाग्य इन येथे शनिवारी (ता. ७) आदिवासी विकास परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवींद्र पाटील, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, पद्मश्री परशुराम गंगावणे, अप्पर आयुक्त गोपीचंद कदम, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, आदिवासी कातकरी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विश्वास वाघ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
वुईके म्हणाले, की आदिवासी समाजाच्या प्रथा व संस्कृतीचे जतन करणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटकाला योजनांचा लाभ मिळावा, यासाठी अधिकारीवर्गानेही प्रयत्नशील राहावे. समाजातील एकही व्यक्ती योजनांपासून वंचित राहू नये, अशी जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे, असेही त्यांनी सांगितले.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रोहा येथे आदिवासी समाजासाठी आदिवासी भवन उभारण्याची मागणी केली. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी रोजगार हमी योजनांद्वारे आदिवासी समाजाला न्याय मिळेल, असे सांगितले.
या वेळी रायगड जिल्ह्यातील महिला बचत गट, वीटभट्टी कामगार तसेच वैयक्तिक महिला लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेश व शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.