मुंबई

करोडोंचा खर्च तरीही पाण्याची प्रतीक्षा

CD

कोट्यवधींचा खर्च तरीही पाण्याची प्रतीक्षा
बळीराजा फाउंडेशनचा पाटबंधारे विभागाला इशारा
रोहा, ता. ९ (बातमीदार) ः तालुक्यातील आंबेवाडी ते निवी कालव्याची साफसफाई व दुरुस्तीच्या कामांसाठी आतापर्यंत शासनाने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला. तरीदेखील पाण्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याने शेतकरीवर्गात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कालवा पुन्हा सुरू व्हावा यासाठी सतत शासन दरबारी लढा देणाऱ्या बळीराजा फाउंडेशन रोहा या संस्थेने पाटबंधारे विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बहुचर्चित आंबेवाडी ते निवी कालव्याची कामे अंशतः पूर्ण झाली असून, निवीपर्यंत पाणी सुरळीत पोहोचेल, असा दावा यापूर्वी करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात कालव्याची साफसफाई अद्याप सुरू झालेली नाही. मार्च महिना सुरू झाला तरी पाणी सोडण्याबाबत ठोस नियोजन दिसत नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत, तर दुसरीकडे उर्वरित वाशी, लांढर, तळाघर, निवी हद्दीतील कालव्याची व पोट कालव्याची कामेदेखील धीम्या गतीने सुरू आहेत. यामुळे शेतकरीवर्गामध्ये नाराजीचे वातावरण आहे. याबाबत कोणतीही माहिती संबंधित अधिकाऱ्यांना विचारली असता टोलवाटोलवीची उत्तरे दिली जातात, असे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
कालवा साफसफाईसाठी यंत्रसामग्री येणार असल्याचे सांगितले जात असले तरी कामाची प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही, असेही बळीराजा फाउंडेशनने सांगितले आहे.

प्रशासनाचा शून्य कारभार
आंबेवाडी-निवी कालव्याच्या साफसफाईच्या कामाला अद्याप सुरुवात केलेली नाही. कालवा दुरुस्तीची कामे अंशत: पूर्णत्वास गेली आहेत तरीही पाणी सोडण्याचे नियोजन नाही. पाटबंधारे विभागाचा नियोजनशून्य कारभार असल्याचा आरोप बळीराजा फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी केला आहे, तर कालव्याच्या कामावर आत्तापर्यंत कोट्यवधींचा निधी खर्च केला आहे. याची जाणीव अधिकाऱ्यांना का नाही? पाणी सोडण्याचा उद्देश पूर्ण का केला जात नाही, असा सवाल फाउंडेशनचे ॲड. दीपक भगत यांनी उपस्थित केला आहे.

लवकरच कालव्यात पाणी येणार
कालव्याला पाणी सोडण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरच कालव्यात पाणी येणार, अशी माहिती कार्यकारी अभियंता मिलिंद पवार यांनी दिली आहे.
फोटो कॅप्शन : करोडो रुपये खर्च करून कालव्याची दुरुस्तीची कामे पूर्ण झाली. मात्र, पाणी नसल्यामुळे कालवा कोरडा पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT