मुंबई

मुरबाड-कल्याण मार्गावर प्रवासी त्रस्त

CD

मुरबाड, ता. ९ (वार्ताहर) : मुरबाड ते कल्याण या महत्त्वाच्या महामार्गावर धावणारी एसटी बस सेवा काही महिन्यांपासून अनियमित होत असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. दररोज हजारो प्रवासी या मार्गावरून प्रवास करत असतानाही बसची संख्या अपुरी आहे. वेळापत्रकाचे पालन होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
मुरबाड तालुक्यातील अनेक विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी; तसेच रुग्ण उपचारासाठी नियमित कल्याण शहरात ये-जा करतात. त्यामुळे मुरबाड-कल्याण हा मार्ग तालुक्यासाठी जीवनवाहिनी मानला जातो. मात्र, सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळेत बस वेळेवर न आल्याने प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. अनेक वेळा प्रवाशांना तासन् तास बसची प्रतीक्षा करावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. विशेषतः शिक्षण व नोकरीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकदा बस पूर्ण भरून येत असल्याने काही प्रवाशांना बसमध्ये चढताही येत नाही. परिणामी, प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो आणि त्यामुळे प्रवास खर्चातही वाढ होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

या मार्गावर बसची संख्या वाढविणे, नियमित वेळापत्रकानुसार सेवा सुरू ठेवणे आणि गर्दीच्या वेळी अतिरिक्त बस सोडण्याची मागणी प्रवाशांकडून वारंवार केली जात आहे. नागरिकांसह प्रवासी संघटनांनी याबाबत परिवहन विभागाकडे अनेकदा तक्रारीही केल्या. मात्र, या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे.
- ज्ञानेश्वर मुरबाडे, अध्यक्ष, मुरबाड एसटी प्रवासी संघटना

नोकरदार, विद्यार्थ्यांसमोर अडचणी
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, काही वेळा अचानक बस फेऱ्या रद्द केल्या जातात किंवा वेळापत्रक बदलले जाते. त्याबाबत बसस्थानकावर कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नाही. याचा त्रास ग्रामीण भागातील प्रवाशांना सहन करावा लागत आहे. अनेक विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात उशीर होतो, तर नोकरदार वर्गालाही वेळेवर कामावर पोहोचण्यात अडचणी निर्माण होत आहेत.


प्रवासी संघटनेच्या मागण्या
- नादुरुस्त बस थांबवून नवीन बस चालवाव्यात.
- मुरबाड-कल्याण मार्गावर चांगल्या दर्जाच्या बस उपलब्ध कराव्यात.
- बस सेवा वेळापत्रकानुसार सुरू ठेवावी.
- एसटी व्यवस्थापनात पारदर्शकता आणावी.
- समस्या न सुटल्यास मोठे आंदोलन उभारण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT