मुंबई

मॅरेथॉनला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

टिटवाळ्यात स्त्रीशक्तीचा जयघोष
जीवनदीप महाविद्यालयाच्या ‘महिला सन्मान मॅरेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
कल्याण, ता. ९ (वार्ताहर) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जीवनदीप शैक्षणिक संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘महिला सन्मान मॅरेथॉन’ला महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रासोबतच सामाजिक बांधिलकी जपत रविवारी पार पडलेल्या या दौडमध्ये ३५० हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवत आपल्या फिटनेस आणि जिद्दीचे दर्शन घडवले.

मॅरेथॉनची सुरुवात टिटवाळा येथील पद्मावती बिल्डिंग येथून करण्यात आली, तर घोटसई फाटा येथे या स्पर्धेची सांगता झाली. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जयश्री सासे यांनी श्रीफळ वाढवून मॅरेथॉनचा आरंभ केला. या वेळी मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवला. याप्रसंगी भाजपा युवानेते दिनेश कथोरे, उद्योजक मंगेश बनकरी, चिंतामण मगर, रेश्मा मगर आणि शेखर लोणे यांसह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मॅरेथॉनच्या यशस्वी आयोजनासाठी जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, संचालक प्रशांत घोडविंदे आणि संचालिका स्मिता घोडविंदे यांचे विशेष नियोजन लाभले. तसेच प्राचार्य डॉ. अशोक वाघ, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे, प्रकाश रोहणे, मुख्याध्यापिका भावना कुंभार, क्रीडा प्रशिक्षक मोहनीश देशमुख आणि निकिता राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले.

तरुणींपासून ज्येष्ठ महिलांपर्यंत उत्साह
या मॅरेथॉनचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ तरुणीच नव्हे, तर ६० वर्षांच्या ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांनीच मोठ्या जिद्दीने धाव पूर्ण केली. आरोग्य आणि स्त्रीशक्तीचा संदेश देत महिलांनी हा क्रीडा सोहळा यशस्वी केला.

पैठणी आणि पुरस्कारांचा वर्षाव
विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते मानाची पैठणी, रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच कार्यक्रमात आयोजित लकी ड्रॉमुळे उपस्थितांमध्ये मोठी उत्सुकता होती. यामध्ये भाग्यवान विजेत्या महिलांना पैठणीची भेट देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं स्वस्त झालं की महागलं? दोन दिवसांतच भावात मोठा बदल; आजचा ताजा दर पाहा

Pan Masala Plastic Ban : पान मसाला खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Massajog Election: मोठी बातमी! स्व. संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव; स्वरुपानंद देशमुख विजयी

Latest Marathi News Live Update : माझा विजय म्हणजे गोरगरीब जनतेचा विजय- देशमुख

'झोपडपट्टीत संपूर्ण बालपण गेल्यावर…' सिद्धार्थ जाधव जुन्या आठवणी सांगताना म्हणाला... लाइट सुरू ठेवण्यासाठी आम्ही

SCROLL FOR NEXT