विटांनी भरलेला ट्रक महामार्गावर उलटला
कासा, ता.९ (बातमीदार) : विटांनी भरलेला ट्रक आंबोली गावाजवळ उलटल्याने चालकासह सहाय्यक जखमी झाला आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर घटना रविवारी (ता.८) दुपारी ही घटना घडली असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या ट्रकला आंबोली गावाजवळ अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने महामार्गाच्या तिसऱ्या वाहिनीवर पलटी झाला. अपघातात चालक प्रमोद मलावकर, सहाय्यक कमलेश घोरखाना (वय २८, रा. धानीवरी) जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चारोटी महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने धुंदलवाडी येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. तसेच क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त ट्रक बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.