मुंबई

भिवंडीत ३९ लाखांचा अफू जप्त

CD

भिवंडी, ता. ९ (वार्ताहर) : भिवंडीतून अफूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या एका नशेच्या सौदागराला नारपोली पोलिसांनी अटक केली असून त्याचे दोन साथीदार फरार झाले आहेत. राकेशकुमार भवरलाल गोदारा (वय ३०, रा. जोधपूर) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओवळीखिंड ते माणकोली मार्गावर अमली पदार्थांची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती नारपोली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला असता राकेशकुमार गोदारा आणि त्याचे दोन साथीदार अफूची बेकायदा वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी आरोपीकडून अफूच्या वाहतुकीसाठी वापरलेली दोन वाहने जप्त केली. तसेच १५१ किलो वजनाचे सुकलेल्या अफूचे बोंडे व त्याचा चुरा असा सुमारे ३९ लाख ९८ हजार ३७५ रुपये किमतीचा अमली पदार्थही जप्त करण्यात आला. याप्रकरणी हवालदार किशोर भामरे यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध नारपोली पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेशकुमार याला अटक केली असून त्याचे दोन साथीदार फरार झाले आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT