मालमत्ता करवाढीची टांगती तलवार
मिरा-भाईंदर महापालिकेचा आज अर्थसंकल्प
भाईंदर, ता. ९ (बातमीदार) : शहरात नव्या मालमत्तांच्या कर आकारणीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या महासभेत घेण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर पालिकेकडून सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात (ता. १०) दरवाढीबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
आयुक्त राधाबिनोद शर्मा प्रशासनाने तयार केलेला अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर करतील. गेल्या वर्षी प्रशासकीय राजवटीत २,६९४ कोटी ८९ लाख रुपयांचा आणि ८४ लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आयुक्त संजय काटकर यांनी सादर केला होता. त्यात प्रशासनाकडून किती वाढ केली गेली आहे, हे उद्या स्पष्ट होणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सात कलमी कार्यक्रमाद्वारे नागरिकांना प्रभावी व पारदर्शकपणे जास्तीत सुविधा देण्यासाठी उपाययोजना करण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला असल्याचे आयुक्तांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात कोणत्या विशेष बाबींचा समावेश केला जातो, याबाबतची उत्सुकता वाढली आहे. विशेषकरून नव्या मालमत्तांच्या कर आकारणीसाठी सत्ताधारी भाजपने केलेली दरवाढ आयुक्तांनी स्वीकारून त्याचा अर्थसंकल्पात समावेश केला आहे की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाय उत्पन्नवाढीसाठी कोणती पावले प्रशासनाने उचलली आहेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
-------------------------------------
उत्पन्नवाढीचे आव्हान
- मिरा-भाईंदर महापालिकेची सध्याची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात उत्पन्नवाढीचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून कर आकारणी होणाऱ्या नव्या मालमत्तांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला होता.
- या दरवाढीला भाजपमधील एका नगरसेविकेसह विरोधकांनी आक्षेप घेतला होता. तसेच भाड्याने देण्यात येणाऱ्या मालमत्तांना आकारण्यात येणाऱ्या करासंबंधीचा विषय महासभेपूढे मांडण्यात आला होता. मात्र, ही दरवाढ रद्द करा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
-----------------------------
महासभेत अंतिम स्वरूप
प्रशासकीय राजवटीत गेल्या तीन आर्थिक वर्षांचे अर्थसंकल्पातील तरतुदींची अंमलबजावणी आयुक्तांनी केली होती. मात्र, अर्थसंकल्पाला आधी स्थायी समितीत नंतर महासभेत अंतिम स्वरूप मिळणार आहे. त्यामुळे आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर स्थायी समितीत चर्चा होऊन त्यात समितीकडून फेरबदल केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.