खारघर, ता. १० (बातमीदार) : श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या शहिदी समागम सोहळ्यानिमित्त खारघर परिसरात स्वच्छता आणि सुशोभीकरणाचे मोठे काम करण्यात आले असून, संपूर्ण परिसर स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. या पार्श्वभूमीवर खारघरकर नागरिकांनी समाधान व्यक्त करत, ही स्वच्छता कायम राखण्यासाठी पालिकेने प्रयत्न करावेत, अशी मागणी खारघरवासीयांकडून केली जात आहे.
श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम सोहळ्यासाठी राज्यभरातून, तसेच देशाच्या विविध भागांतून लाखो भाविक खारघरमध्ये दाखल होणार असल्याने प्रशासन आणि पालिकेने विशेष मोहीम राबवून रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे आणि परिसराची स्वच्छता करून शहरात कोठेही कचरा दिसणार नाही, याची काळजी घेण्यात आली होती. तसेच पदपथावरील फेरीवाले हटवून रस्ते आणि पदपथ मोकळे करून पदपथांची डागडुजी करण्यात आली आहे. कचरा उचल, रस्ते धुलाई, झाडाझडती तसेच विद्युत रोषणाई आणि सजावटीची कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे खारघर शहर स्वच्छ आणि सुंदर दिसत होते. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या भाविकांनी पालिका, तसेच खारघरचे कौतुक केले होते. विशेषतः शहर स्वच्छतेमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडल्याचे भर पडली आहे. मात्र, हा बदल केवळ कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता कायमस्वरूपी असावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.