कासू येथे महसूल समाधान शिबिरास सुरुवात
पेण, ता. ९ (वार्ताहर) : राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाची सुरुवात पेण तालुक्यातील कासू मंडळात शनिवारी (ता. ७) करण्यात आली.
या शिबिराचे उद्घाटन आमदार रवींद्र पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, जिल्हा परिषद सदस्या पल्लवी भोईर, पंचायत समिती सदस्य संजय भोईर, प्रीती पाटील, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, नितीन परदेशी, रश्मी साळुखे, साकव संस्थेचे अध्यक्ष अरुण शिवकर, कृषी अधिकारी सागर वाडकर, कृषी सहाय्यक शंकर तवर, संजय शिंगे, वासुदेव म्हात्रे, ग्रामपंचायत अधिकारी मच्छिंद्र पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या शिबिरामध्ये नागरिकांना शासकीय व शैक्षणिक दाखले, महसुली तक्रारी, प्रलंबित दावे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
चौकट
‘एक खिडकी’ पद्धतीने सेवा
या अभियानात महसूल विभागाचे सर्व अधिकारी एकाच ठिकाणी उपलब्ध राहून नागरिकांच्या विविध महसुली कामांचे तत्काळ निवारण करण्यात येणार आहेत. या शिबिरामुळे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतिमान होईल, असा विश्वास प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी व्यक्त केला. तसेच नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.