डॉ. आंबेडकर पुतळ्यासाठी २० वेळा निवेदन
मोर्चाचा इशारा
तुर्भे, ता. ९ (बातमीदार) : नवी मुंबई शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) आणि मराठा आघाडीने प्रशासनाला आतापर्यंत २० हून अधिक वेळा निवेदन दिले असूनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
येत्या १५ दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास महापालिकेवर तीव्र मोर्चा काढण्याचा इशारा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे यांनी दिला आहे. या वेळी १२ फेब्रुवारी २०२६ला झालेल्या जनता दरबारात वनमंत्री गणेश नाईक यांनी सामाजिक विकासासाठी असलेले सिडको व एमआयडीसीचे भूखंड बिल्डरांना विकण्यात आल्याचे नमूद केले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली.
चौकट
शहरातील नागरी समस्यांकडे लक्ष वेधले
फेरीवाल्यांचे धोरण निश्चित नसल्याने फुटपाथ व रस्त्यांवर अतिक्रमण वाढत आहे. वाढती लोकसंख्या आणि उंच इमारतींमुळे पार्किंगची समस्या गंभीर होत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच अनधिकृत बांधकामांमुळे शासनाचा महसूल बुडत असल्याने या सर्व प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.