बोरीवलीत ‘छंदोत्सव’मधून सामाजिक संदेश
मुंबई, ता. ९ : बोरिवली येथील गंगाधर नगर सोसायटीमध्ये ‘छंदोत्सव’ या उपक्रमाचे आयोजक आनंद भावे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांनी सोसायटीतील सदस्यांना छंद जोपासण्याचे महत्त्व तसेच दैनंदिन जीवनातील टाकाऊ वस्तूंपासून कल्पकतेने विविध उपयुक्त व आकर्षक वस्तू कशा तयार करता येतात याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
‘छंदोत्सव’ या गटामार्फत विविध छंदांची प्रदर्शने, कार्यशाळा आणि व्याख्याने आयोजित केली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. याप्रसंगी आनंद भावे यांनी टाकाऊ वस्तूंमधून तयार केलेल्या कलात्मक वस्तूंचे छोटेखानी प्रदर्शनही मांडले होते. या प्रदर्शनातून पुनर्वापराच्या माध्यमातून सर्जनशीलता कशी विकसित करता येते, याची माहिती उपस्थितांना मिळाली.
कार्यक्रमात सोसायटीतील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विशेषतः लहान मुलांनी मोठ्या उत्साहाने प्रत्यक्ष कृतीतून विविध वस्तू तयार करण्याचा अनुभव घेतला. मुलांकडून कागदाच्या टोप्या, सजावटीच्या वस्तू आदी कल्पक कलाकृती तयार करून घेत आनंद भावे यांनी त्यांना मार्गदर्शन केले.
या उपक्रमामुळे छंद जोपासण्याची प्रेरणा मिळालीच, तसेच टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून पर्यावरणपूरक उपक्रम कसे राबवता येतात, याची जाणीवही उपस्थितांना झाली. सोसायटीतील सदस्यांनी या कार्यक्रमाचे मनापासून स्वागत करत भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.