मुंबई

फुंडे विद्यालयात महिला दिन उत्साहात

CD

फुंडे विद्यालयात महिला दिन उत्साहात
उरण, ता. ९ (वार्ताहर) : रयत शिक्षण संस्थेच्या तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय, फुंडे येथे प्राचार्य बी. बी. साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ११६ वा आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला विद्यालयाचे चेअरमन कृष्णाजी कडू, उपमुख्याध्यापिका एस. डी. थोरात, पर्यवेक्षिका एस. एम. बाबर, एस. एस. पाटील, प्रमुख वक्ते एस. डी. म्हात्रे, वरिष्ठ लिपिक नितीन म्हात्रे, नवनीत ठाकूर आदी उपस्थित होते. प्रारंभी त्यागमूर्ती लक्ष्मीबाई पाटील व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या वेळी विद्यालयातील सर्व शिक्षिका व महिला कर्मचाऱ्यांचा पुष्प व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थिनी श्रेया शिंदे, आर्या शिर्के, कांचन घुगे आणि श्रवण गोरे यांनी थोर महिलांची माहिती सादर केली. तसेच सुहानी प्रजापती हिने गीत सादर केले.
ज्येष्ठ शिक्षक आर. जी. शेळके यांनी हृदयस्पर्शी कविता सादर केली. यावेळी वक्त्यांनी महिलांनी शिक्षण, क्रीडा, विज्ञान व राजकारण क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा गौरव करत स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एच. एन. पाटील यांनी केले, तर आभार उपमुख्याध्यापिका एस. डी. थोरात यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dabholkar Murder Case : नरेंद्र दाभोलकर हत्याकांडात मोठी अपडेट ! शरद कळसकरला हायकोर्टाकडून जामीन मंजूर

IPL 2026, Video: तुझ्या बॅटमध्ये AI चीप आहे? वैभव सूर्यवंशीच्या उत्तरानं टीका करणाऱ्या पाकड्यांची बोलती होईल बंद

Visa Report: भारतातील श्रीमंत आता वस्तूंवर नाही तर ‘या’ गोष्टींवर खर्च करतायत! Visa च्या रिपोर्टमधून मोठा खुलासा

अमराठी चालक 'अ, आ, इ' शिकणार, मराठीसाठी ‘परिवहन’ची विशेष मोहीम; प्रताप सरनाईक यांची घोषणा

Pachod News : इंस्टाग्रामवरील ओळखीतून अल्पवयीन मुलगी पाचोडला; पोलिसांनी शोध घेऊन घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT