थकीत देयकांमुळे कंत्राटदारांची उपासमार
पालघर जिल्हा परिषद कार्यालयाजवळ धरणे आंदोलन
पालघर, ता. ९ (बातमीदार)ः जिल्ह्यातील जलजीवनअंतर्गत कंत्राटदारांची २४५ कोटींची थकीत देयके तसेच इतर मागण्यांवरून कंत्राटदार आक्रमक झाले आहेत. याच अनुषंगाने पालघर जिल्हा परिषदेच्या कार्यालयाजवळ धरणे आंदोलन सुरू केले आहे.
महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनाच्या नेतृत्वाखाली पालघर जिल्ह्यातील जलजीवन मिशनअंतर्गत कंत्राटदार विविध मागण्यांसाठी पालघर जिल्हा परिषदेच्या कार्यालयाजवळ धरणे आंदोलनात बसले आहेत. पालघर जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत केलेल्या कामांची २४५ कोटींची देयके थकीत आहेत, जलजीवन मिशनअंतर्गत सर्व कामांची थकीत देयके १००% पारित करावी, निधीअभावी अर्धवट किंवा रखडलेल्या सर्व कामांना सरसकट विनादंड मुदत मिळावी, जलजीवन मिशनअंतर्गत येणाऱ्या योजनांच्या विलंबामुळे दंडात्मक कारवाईचे पैसे परत करावे, सुधारित दराने डीसीआरप्रमाणे मूल्यांकन मिळावे, अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
---------------------------------
पालघर जिल्ह्यातील पाणीपुरवठा कंत्राटदारांचे २४५ कोटींची देयके थकीत आहेत. त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. अनेक वेळा तक्रारी आंदोलने केली. मात्र, शासन लक्ष देत नसल्याने आंदोलन करावे लागत आहे.
- अजय यादव, जिल्हाध्यक्ष, पालघर जिल्हा पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.