मुंबई

नवी मुंबईत ‘माईंडस्पेस इको-रन २.०’

CD

नवी मुंबईत ‘माइंडस्पेस इको-रन २.०’
चार हजार धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग
फिटनेस आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश; प्लांटेबल बिब्स व सेंद्रिय जर्सीचे आकर्षण
नवी मुंबई, ता. ९ (वार्ताहर) : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आणि फिटनेसची जाणीव निर्माण करत नवी मुंबईतील ऐरोली येथे ‘माइंडस्पेस इको-रन २.०’ ही मॅरेथॉन शनिवारी (ता. ७) उत्साहात पार पडली. माइंडस्पेस आरइआयटी आणि मिर्ची यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत सुमारे चार हजारहून अधिक धावपटूंनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
अभिनेत्री डेझी शाह, मेधा शंकर आणि अभिनेता अविनाश तिवारी यांच्या उपस्थितीत ५, १० आणि २१ किलोमीटर अंतराच्या शर्यतींना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. शहरातील विविध वयोगटातील धावपटू, फिटनेसप्रेमी तसेच पर्यावरणाबाबत जागरूक नागरिक मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले होते.
या इको-रनमध्ये सहभागी धावपटूंना पर्यावरणपूरक प्लांटेबल बिब्स आणि सेंद्रिय जर्सी देण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत २१ किमी (हाफ मॅरेथॉन), १० किमी आणि ५ किमी अशा तीन श्रेणी ठेवण्यात आल्या होत्या. २१ किमी आणि १० किमी शर्यतीतील विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमादरम्यान जमा झालेला सर्व कचरा पुनर्प्रक्रिया करून त्यापासून शालेय मुलांसाठी खुर्च्या तयार केल्या जाणार आहेत. हे फर्निचर सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून गरजू शाळांना भेट म्हणून देण्यात येणार आहे.
माइंडस्पेस आरइआयटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश नायर यांनी सांगितले की, कामाच्या ठिकाणी सामाजिक आणि पर्यावरणीय बदल घडवून आणण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. नवी मुंबईनंतर ही इको-रन स्पर्धा आता हैदराबादमध्येही आयोजित करण्यात येणार आहे.

चौकट
पर्यावरणपूरक उपक्रमाचे वेगळेपण
‘माइंडस्पेस इको-रन २.०’चे मुख्य उद्दिष्ट फिटनेससोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे हे आहे. प्लांटेबल बिब्स, सेंद्रिय जर्सी आणि कचऱ्याच्या पुनर्प्रक्रियेद्वारे तयार होणारे शालेय फर्निचर या उपक्रमाला वेगळेपण देतात. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता वाढण्यास मदत होत असून, सामाजिक जबाबदारीची जाणीवही निर्माण होत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT