मुंबई

डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात

CD

डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात
विरोधी पक्षानेही पुढाकार घ्यावा; प्रवासी संघटनेची मागणी

पालघर, ता. ९ (बातमीदार) : पश्चिम रेल्वेवरील डहाणू लोकल सुरू होऊन १३ वर्षे पूर्ण झाली आहेत, तर दुसरीकडे, वैतरणा ते डहाणू यादरम्यान प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या सुरू असलेल्या लोकलच्या फेऱ्या अपुऱ्या पडत असून, गर्दीमुळे सफाळे व वैतरणा येथील प्रवाशांना मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये चढणेही कठीण होत असल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी जोर धरत आहे. सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींमार्फत रेल्वेमंत्री, रेल्वे बोर्ड व संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदने देऊन पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात फेऱ्या वाढविण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली दिसत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे. रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदने देणे, तसेच संसद व विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करणे गरजेचे असल्याचे संस्थेचे मत आहे.
१ एप्रिलपासून उपनगरीय लोकलचे नवीन वेळापत्रक लागू होणार असल्याने त्या वेळापत्रकात डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच डहाणू मार्गावर १५ डब्यांची लोकल सुरू करण्याची मागणीही डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT