मुंबई

मुंबई नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत भिवंडीतील दोन रिक्षा चालकांचा मृत्यू

CD

अपघातात भिवंडीतील
दोन रिक्षाचालकांचा मृत्यू
भिवंडी, ता. ९ (वार्ताहर) ः मुंबई-नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाने रिक्षाला दिलेल्या धडकेत भिवंडीतील दोन रिक्षाचालकांचा सोमवारी (ता. ९) मृत्यू झाला. रिक्षाचालक राजकुमार गुप्ता (४०) आणि महेंद्र केसरवानी (३९) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. या घटनेने घुंगट नगर परिसरात शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील घुंघट नगर परिसरात राहणारे रिक्षाचालक राजकुमार आणि महेंद्र हे दोघेही रिक्षाने भिवंडी बायपास मार्गे सोनाळेच्या दिशेने जात होते. दरम्यान, त्यांची रिक्षा मुंबई-नाशिक महामार्गावरील सोनाळे हद्दीत पोहोचताच मागून आलेल्या एका अज्ञात वाहनाने रिक्षाला जोरादार धडक दिली. ही धडकेने दोघे चालक रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरातील स्थानिक नागरिकांनी तत्काळ दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: एप्रिलमध्ये सोनं स्थिर! आता महागणार का? खरेदीदारांनी काय करावं?

Bihar Crime News : भाजप नेत्याच्या पुतण्याची गोळ्या झाडून हत्या, मेहुणा गंभीर जखमी, भर रस्त्यात नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार, प्रहार संघटना कायम

Latest Marathi News Live Update : खासदार संजय राऊत पुण्यात येताच वसंत मोरे यांच्यावर मोठी जबाबदारी

Eknath Shinde Hasan Mushrif : गोकुळ दूध संघाच्या राजकारणात एकनाथ शिंदेची एन्ट्री, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीआदी दिल्या सूचना; हसन मुश्रीफांना अप्रत्यक्ष पाठबळ

SCROLL FOR NEXT