मुंबई

ठाण्यातील येऊर रस्त्यावर मारहाण; भाजप नगरसेवकाच्या भावाची ५ तोळ्यांची सोन्याची चेन हिसकावली

CD

ठाण्यातील येऊर रस्त्यावर मारहाण
पाच तोळ्यांची सोन्याची चेन हिसकावली

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : येऊरजवळील रस्त्यावर एक चारचाकी अडवून मारहाण करत सोन्याची चेन लंपास केल्याची घटना सोमवारी (ता. ९) घडली. भाजप नगरसेवकाच्या भावासह त्याच्या मित्रांना या प्रकरणात मारहाण केल्याचे उघडकीस आले असून, दरम्यान, पाच तोळ्यांची सोन्याची चेन हिसकावल्याचे समोर आले आहे. चेनची अंदाजे किंमत पाच लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून, याप्रकरणी पोलिसांकडून तिघांविरोधात वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घोडबंदर रोड, हिरानंदानी इस्टेट येथे राहणारे अल्पेश जयसिंग सरैय्या (वय ४५) हे भाजप नगरसेवक यांचे बंधू आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीत ते, बांधकाम कंत्राटदार असून, रविवारी (ता. ८) मार्च रोजी ते त्यांचा मित्र हेमंत भोसले आणि शंकर शेट्टी यांच्यासोबत येऊर गावातील सरैय्या फार्महाउस येथे गेले होते. तेथून सोमवारी (ता. ९) मार्च रोजी मध्यरात्री चारचाकीने घरी परतत असताना, एक्झोटिका हॉटेलजवळ एका चारचाकीमुळे वाहतूक कोंडी झाली होती. सरैय्या यांनी ती चारचाकी बाजूला घेण्यास सांगितल्यावर त्या चारचाकीमधील तीघे त्यांच्या अंगावर धावून आले व शिवीगाळ करत मारहाण केली. झटापटीदरम्यान एका इसमाने सरैय्या यांच्या गळ्यातील सुमारे पाच तोळे वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीने ओढली. तसेच त्यातील एकाने ‘मी मोठा डॉन आहे, माझ्या नादाला लागलात तर सोडणार नाही,’ अशी धमकी दिली. या घटनेनंतर ते तिघेही कारमधून पसार झाले. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शिवाजी राजं म्हणायचं', 'राजा शिवाजी'मधील सलमान खान प्रेक्षकांना प्रचंड भावला, शत्रूंना म्हणाला...

New Rule: 1 मेपासून पैशांशी संबंधित मोठे बदल! ATM, UPI, गॅस सिलिंडर ते क्रेडिट कार्ड; काय बदलणार, काय महागणार?

Akola News: जिल्ह्यातील तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित;पाच केंद्रांना नोटीस; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची कारवाई

Nagpur News: आउटसोर्स एजन्सीचे पोषण, कामगारांचे कुपोषण; कंत्राटी कामगार धोरणातून उभारली शोषणाची नवी व्यवस्था

Love Jihad funding : ‘लव्ह जिहाद’चे फंडिंग रोखण्याचे आव्हान, किरीट सोमय्या शिरोलीत ग्रामपंचायतीस भेट; नाशिक, शिरोलीचा मास्टरमाईंड एकच

SCROLL FOR NEXT