मुंबई

डहाणू शहराला धोक्याची घंटा

CD

डहाणू शहराला धोक्याची घंटा
कंक्राडी नदीपात्रात भिंतीचे बांधकाम, पावसाळ्यात पुराची भीती
कासा, ता. १० (बातमीदार)ः कंक्राडी नदीच्या पात्रात खासगी विकसकाकडून भराव टाकून संरक्षण भिंतीचे बांधकाम केले जात आहे. यामुळे पावसाळ्यात डहाणू शहरात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
कंक्राडी नदी डहाणू शहरातील नैसर्गिक जलवाहिका म्हणून ओळखली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत नदीकाठावर मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाली असून, काही ठिकाणी नदीच्या पात्रात अतिक्रमण करून संरक्षण भिंती व इमारती उभारण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नदीचा मूळ प्रवाह अरुंद झाला असून, पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे, समुद्राला भरती असताना मुसळधार पाऊस पडल्यास नदीचे पाणी उलट दिशेने शहरात शिरत असल्याने दरवर्षी सखल भागांचे पाणी शिरून मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे नदीपात्रातील बांधकाम भविष्यात धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
---------------------------------
भविष्यात पुराचा धोका
- इराणी रोड परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या उद्भवत असताना नदीपात्रालगत सुरू असलेल्या या नव्या बांधकामामुळे मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
- नदीपात्रात झालेला भराव, उभारलेल्या अनधिकृत भिंती हटवल्या नाहीत, तर भविष्यात पुराचा धोका अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन अतिक्रमणांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
----------------------------
कंक्राडी नदी असल्याचे स्पष्ट करत पूर नियंत्रण रेषा आखण्याचे आदेश देण्यात आले. सध्या हे काम अंतिम टप्प्यात असले तरी नदीपात्रात सुरू असलेल्या भरावामुळे भविष्यात मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात.
- प्रकाश अभ्यंकर, मानद सचिव, सोसायटी फॉर फास्ट जस्टिस
-------------------------------
प्रकल्पाचे रेखांकन नगरपालिकेकडून मंजूर झाले आहे. त्यानुसार रस्ते, गटार, स्ट्रीट लाइटची कामे सुरू आहेत. भूमी अभिलेख विभागाकडून जागेची मोजणीही पूर्ण झाली आहे. त्यामुळे जागेचे संरक्षण करण्यासाठी संरक्षण भिंत उभारण्याचे काम सुरू केले आहे.
- राजेंद्र केळकर, जागा मालक
--------------------------------
कंक्राडी नदीपात्रात जलाराम खाडी परिसरात संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याविषयी अधिक चौकशी करून आवश्यक सूचना देण्यात येतील. दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- अक्षय गुडधे, मुख्याधिकारी, डहाणू नगर परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Update: अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टने उडवली खळबळ, त्यात लिहिलंय...

BAMU Recruitment: मराठवाडा विद्यापीठात ७८ पदांसाठी तब्बल ६,९१४ अर्ज; हार्डकॉपीसाठी १८ मार्चपर्यंत मुदत

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत घरगुती गॅस टंचाई

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

Teacher Cyber Fraud Case : तुमच्या मोबाईलवरही असा व्हिडिओ कॉल येतोय? CBI अन् पोलिसांच्या नावाने निवृत्त शिक्षकाला घातला 59 लाखांचा गंडा, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT