मुंबई

उल्हासनगरात आयुष्यमान आरोग्य मंदिर सुरू

CD

उल्हासनगर, ता. १० (बातमीदार) : राज्य सरकारच्या निर्देशानुसार महिलांच्या आरोग्य संरक्षणासाठी उल्हासनगर महापालिकेच्या वतीने ‘आयुष्यमान आरोग्य मंदिर’ या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. या उपक्रमांतर्गत महिलांसाठी लसीकरण; तसेच गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या आरोग्य मंदिराचे उद्‍घाटन महापौर अश्विनी निकम, आयुक्त मनीषा आव्हाळे आणि उपमहापौर अमर लुंड यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपायुक्त अनंत जवादवार तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा उपस्थित होते.
वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांनी गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून बचावासाठी लसीकरणाचे महत्त्व उपस्थितांना सविस्तर समजावून सांगितले. या मोहिमेच्या माध्यमातून महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढवण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांना संबोधित करत लसीकरण मोहिमेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. महिलांच्या आरोग्याचे संरक्षण ही काळाची गरज असून, या मोहिमेमुळे भविष्यातील गंभीर आजारांपासून बचाव शक्य होईल, असे त्यांनी नमूद केले. तसेच लसीकरणाबाबत जनजागृती वाढवण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, या मोहिमेबाबत अधिक माहिती हवी असल्यास नागरिकांनी जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी किंवा संबंधित आशासेविकेशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

मुलींसाठी लसीकरण मोहीम
मोहिमेअंतर्गत १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींना लस देण्यात येणार असून, ही मोहीम ८ मार्चपासून पुढील ९० दिवसांपर्यंत राबविण्यात येणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी पालिकेच्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. उद्‍घाटनाच्या दिवशी एकूण ११ मुलींना लसीकरण करण्यात आले, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. ही लस गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. लसीकरणामुळे भविष्यात कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करण्यास मदत होते, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT