खत खरेदीसाठी केद्रांवर गर्दी
उन्हाळी भातशेतीसाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा
कासा, ता. १० (बातमीदार) : डहाणू तालुक्यात उन्हाळी भातशेती जोमात सुरू असून, सध्या पिकाला खत देण्याचा हंगाम सुरू झाल्याने कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कासा परिसरातील विविध कृषी सेवा केंद्रांवर युरिया खत खरेदीसाठी शेतकरी सकाळपासूनच रांगा लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
डहाणू तालुक्यातील धामणी व कवडास धरणातून सुरू असलेल्या सूर्या प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्यांमधून शेकडो गावांना पन्हाळी सिंचनासाठी पाणीपुरवठा केला जातो. तसेच या प्रकल्पातून अनेक औद्योगिक केंद्रांसह वसई-विरार व मिरा-भाईंदर परिसरालाही पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. या कालव्यांमधून मिळणाऱ्या पाण्यावर डहाणू, विक्रमगड आणि पालघर तालुक्यातील अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात उन्हाळी भात तसेच भाजीपाला लागवड करतात.
सध्या उन्हाळी भातलागवडीचे काम पूर्ण झाले असून, पिके भरात आली आहेत. मात्र, पिकांची वाढ चांगली होण्यासाठी खत देणे आवश्यक असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात युरिया खत खरेदीसाठी कृषी केंद्रांकडे धाव घेत आहेत.
पावसाळी हंगामाच्या तुलनेत उन्हाळ्यातील भातशेतीत अधिक उत्पादन मिळते. पावसाळ्यात वादळ, पाऊस व रोगांचा धोका अधिक असतो; मात्र उन्हाळ्यात कालव्याच्या पाण्यावर भातशेती करणे तुलनेने सोपे जाते. त्यामुळे या भागातील अनेक शेतकरी उन्हाळी भातशेतीला प्राधान्य देतात. सध्या पिके भरात असून, खताची आवश्यकता असल्याने खत खरेदीसाठी कृषी केंद्रांवर गर्दी होत आहे. खताचा पुरवठा मर्यादित असल्याने शेतकऱ्यांना रांगेत उभे राहून खत घ्यावे लागत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
- कृष्णा जाधव, शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.