‘घे भरारी’ महिला मिनी मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
१३०० हून अधिक महिलांचा सहभाग; स्वच्छ व हरित नवी मुंबईचा संदेश
वाशी, ता. १० (बातमीदार) : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ अंतर्गत स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी ॲण्ड टुरिझम स्टडिज यांच्या वतीने आयोजित ‘घे भरारी’ महिला मिनी मॅरेथॉनला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध वयोगटातील १३०० हून अधिक महिलांनी या उपक्रमात सहभागी होत कार्यक्रम यशस्वी केला.
या मॅरेथॉनला महापौर सुजाता पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमाद्वारे स्वच्छ व हरित नवी मुंबई साकारण्याचा संकल्प करण्यात आला.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त १४ मार्चपर्यंत विविध उपक्रम आयोजित करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून ही मिनी मॅरेथॉन आयोजित करण्यात आली. डॉ. विजय डी. पाटील यांच्या संकल्पनेतून आणि डॉ. शिवानी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
डी. वाय. पाटील स्टेडियम येथून सुरू झालेल्या पाच किलोमीटरच्या या मिनी मॅरेथॉनमध्ये महिलांनी उत्साहाने धाव घेत आरोग्यदायी जीवनाचा संदेश दिला. या स्पर्धेत निधी कनोजिया हिने प्रथम, भूमी म्हात्रे हिने द्वितीय तर एकता राजभर हिने तृतीय क्रमांक मिळविला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.