मुंबई

श्री कुलस्वामी को-ऑप. क्रेडिट सोसायटीला ‘आदर्श पतसंस्था’ पुरस्कार

CD

श्री कुलस्वामी को-ऑप. क्रेडिट सोसायटीला ‘आदर्श पतसंस्था’ पुरस्कार
१,००० कोटींपेक्षा अधिक खेळते भांडवल असलेल्या गटात तृतीय क्रमांक
जुईनगर, ता. ८ (बातमीदार) : नुकत्याच महाबळेश्वर-पाचगणी येथे महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड, मुंबई यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात श्री कुलस्वामी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेला ‘आदर्श पतसंस्था’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक खेळते भांडवल असलेल्या पतसंस्थांच्या गटातून तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल हा मानाचा पुरस्कार संस्थेला प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार वितरण सोहळ्यासोबत दोनदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळाही आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाला उपआयुक्त व निवडणूक प्राधिकरणाचे उपनिबंधक बाळासाहेब तावरे, ज्ञानदीप सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सोपान शिंदे, जिजाबा पवार, संस्थेचे अध्यक्ष शंकर पिंगळे, संचालक चंद्रकांत वऱ्हाडी, संजय चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत चव्हाण, बाळासाहेब चव्हाण तसेच व्यवस्थापक जीवन हगवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेची सभासद संख्या सध्या एक लाख २१ हजार ९०१ इतकी असून, संस्थेकडे १,२२० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. संस्थेचा स्वनिधी १३३ कोटी रुपये असून, वसूल भागभांडवल ५७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५मध्ये संस्थेने १३ कोटी रुपयांचा नफा मिळवून सभासदांना १० टक्के लाभांश दिला आहे.
चौकट :
संस्थेची आर्थिक कामगिरी :
सभासद संख्या : १,२१,९०१
ठेवी : १,२२० कोटी रुपये
स्वनिधी : १३३ कोटी रुपये
वसूल भागभांडवल : ५७ कोटी रुपये
सभासद कर्ज : १,००३ कोटी रुपये
एकूण संमिश्र व्यवसाय : २,२२३ कोटी रुपये
आर्थिक वर्ष २०२४-२५ नफा : १३ कोटी रुपये
लाभांश : १० टक्के
ढोबळ एनपीए : ४.५९ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT