मुंबई

फुंडे विद्यालयात स्त्री सशक्तीकरणाचा उत्सव

CD

फुंडे विद्यालयात स्त्री सशक्तीकरणाचा उत्सव
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शिक्षिका, विद्यार्थिनींचा सन्मान
उरण, ता. १० (बातमीदार) : रयत शिक्षण संस्था संचालित तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय, फुंडे येथे ११६वा आंतरराष्ट्रीय महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विद्यालयाचे प्राचार्य महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते बी. बी. साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.
या वेळी चेअरमन कृष्णाजी कडू, उपमुख्याध्यापिका एस. डी. थोरात, पर्यवेक्षिका एस. एम. बाबर, एस. एस. पाटील, प्रमुख वक्ते एस. डी. म्हात्रे, वरिष्ठ लिपिक नितीन म्हात्रे, नवनीत ठाकूर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यागमूर्ती लक्ष्मीबाई पाटील व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमात विद्यालयातील सर्व शिक्षिका आणि भगिनींचा पुष्प व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थिनी श्रेया शिंदे, आर्या शिर्के, कांचन घुगे आणि श्रवण गोरे यांनी थोर महिलांच्या कार्याची माहिती सांगितली. तसेच विद्यार्थिनी सुहानी प्रजापती हिने गीत सादर केले.
चौकट :
स्त्री-पुरुष समानतेचा संदेश
कार्यक्रमात बोलताना शिक्षकांनी महिलांनी शिक्षण, क्रीडा, विज्ञान व राजकारण अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून समाजाला दिशा दिल्याचे सांगितले. महिला दिन केवळ ८ मार्चपुरता मर्यादित न ठेवता वर्षभर स्त्रीच्या कर्तृत्वाचा सन्मान व्हावा आणि समाजात स्त्री-पुरुष समानतेची भावना रुजावी, असे आवाहन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई इंडियन्ससाठी Vaibhav Sooryavanshi, तुमची साथ सोडू शकतो; राजस्थान रॉयल्स, 'पोस्टर बॉय'वर लक्ष ठेवा, ३० कोटी...

न्यायातील प्रतारणेबाबत कनिष्ठ न्यायालय बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Latest Marathi News Live Update: संभाजीनगर नागपूर दृतगती महामार्गावर ट्रकला अपघात, चालक ठार

Nita Ambani: नीता अंबानींच्या घरात रोज बनतात तब्बल ४००० पोळ्या! कारण ऐकून तुम्हालाही बसणार नाही विश्वास; Viral

Mumbai News: यंदाही मुंबईची तुंबई! ८० ठिकाणी भरणा-या पाण्याचा उपसा करण्यासाठी ५४७ पंप बसविणार

SCROLL FOR NEXT