मुंबई

‘एनएमएमटी’ला ‘स्मार्ट’चे वेध!

CD

वाशी, ता. १० (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या आर्थिक नियोजन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ चे सुधारित, तसेच २०२६-२७ चे मूळ जमा-खर्चाचे अंदाजपत्रक मंगळवारी (ता. १०) परिवहन व्यवस्थापक योगेश कडूसकर यांनी परिवहन समितीचे सभापती विकास झंजाड यांच्याकडे बंद लिफाफ्यात सादर केले. प्रवाशांना ऑनलाइन सुविधांबरोबर बस ट्रेकिंग प्रणाली विकसित केली जाणार आहे. तसेच कोरोनानंतर पाच वर्षे नवी मुंबई महापालिकेवर प्रशासकीय राजवट होती. या कालावधीत परिवहन विभागाकडून करण्यात आलेल्या विविध कामांचा आढावा घेत त्याचे लेखापरीक्षण (ऑडिट) करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे विभागाच्या कामकाजातील पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाची सेवा अधिक सक्षम व प्रभावी करण्यावर भर देण्यात येणार आहे. राज्यातील उत्कृष्ट परिवहन सेवांमध्ये एनएमएमटीला अग्रक्रमावर आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी परिवहन विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याचा मानस असल्याचेही सभापतींनी सांगितले. यादरम्यान, बसला गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अपघातांची चौकशी करण्याची मागणी सभापतींनी केली आहे.

परिवहन विभागाच्या उत्पन्नात वाढ करण्याबरोबरच महापालिकेच्या अनुदानावर अवलंबून राहण्याची गरज कमी व्हावी, यासाठीही पावले उचलली जाणार आहेत. बससेवेची गुणवत्ता वाढविणे, प्रवाशांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आणि सेवा अधिक कार्यक्षम बनविणे यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बस थांब्यांचा कायापालट होणार
नवी मुंबई शहरातील बस थांबे अधिक आधुनिक व स्मार्ट करण्याचाही उपक्रम हाती घेतला जाणार आहे. प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि सोयीस्कर सुविधा मिळाव्यात, यासाठी बस थांब्यांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून, त्यामध्ये डिजिटल माहिती फलक, बस वेळापत्रकाची माहिती तसेच इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सेवा अधिक सक्षम करण्याचा निर्धार
आगामी आर्थिक वर्षासाठी एनएमएमटीच्या सेवा अधिक सक्षम, आधुनिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने हे अंदाजपत्रक महत्त्वाचे ठरणार असल्याचे मत परिवहन समिती सभापती झंजाड यांनी व्यक्त केले. तसेच या अंदाजपत्रकाचा अभ्यास करून त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा सुचविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. परिवहन प्रशासनाने सादर केलेला अर्थसंकल्प प्रतीक्षेत ठेवून प्रशासकीय कारभाराचा रिमोट सभापतींनी आपल्या हाती ठेवला आहे.

अंदाजपत्रकाचा अभ्यास होणार
प्रशासनाकडून सादर करण्यात आलेल्या या अंदाजपत्रकाचा परिवहन समिती सदस्यांकडून अभ्यास केला जाणार आहे. समिती सदस्यांकडून सूचविण्यात येणाऱ्या सुधारणा व सूचना लक्षात घेऊन अंतिम अंदाजपत्रक तयार केले जाईल. त्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीकडे सादर करण्यात येणार असल्याचे परिवहन समिती सभापती विकास झंजाड यांनी स्पष्ट केले.

प्रवाशांच्या सुविधांवर भर
परिवहन समितीचे जाळे अधिक भक्कम करण्यावर भर असणार आहे. परिवहनच्या ताफ्यात ३२० बस असून, दैनंदिन दोन लाखांहून अधिक प्रवासी लाभ घेत आहेत. नव्याने १५० सीएनजी बस ताफ्यात दाखल होणार आहेत. त्याचप्रमाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्याचे मार्ग तयार करण्यात आले आहे.

- ३२० परिवहनच्या ताफ्यात बस
- १५० नवीन सीएनजी बस
- बस ट्रेकिंग प्रणाली विकसित होणार
- विमानतळाला जोडण्याचे मार्ग तयार
- प्रशासकीय कामाची चौकशी होणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT